जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Kitchen Jugaad - फ्रिजमध्ये तेलाची कमाल; नक्की लावा, काय परिणाम होतो पाहा VIDEO

Kitchen Jugaad - फ्रिजमध्ये तेलाची कमाल; नक्की लावा, काय परिणाम होतो पाहा VIDEO

फ्रिजमध्ये वापरा तेल (फोटो सौजन्य - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)

फ्रिजमध्ये वापरा तेल (फोटो सौजन्य - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)

एका गृहिणीने फ्रिजमध्ये तेलाचा अनोखा असा वापर करून दाखवला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 मे : आपल्या बहुतेकांच्या घरात फ्रिज असतोच. फ्रिजमध्ये आपण पाणी, फळं-भाज्या, उरलेले पदार्थ असं काही ना काही ठेवतो. अशा या फ्रिजमध्ये तुम्ही एकदा तेलाचा वापर करून पाहा. फ्रिजमध्ये तेलाची काय कमाल होते, हे एका गृहिणीने दाखवलं आहे. या किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. अशाच जुगाडापैकी एक हा फ्रिजमधील तेलाचा जुगाड. यात एका महिलेने फ्रिजमध्ये तेलाचा वापर किती फायदेशीर ठरेल हे सांगितलं आहे. तिनं याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं आहे. तिने आपल्या फ्रिजमध्ये तेलाचा वापर केला आणि त्याचा काय परिणाम झाला हे दाखवलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

गृहिणीने सांगितल्यानुसार फ्रिजमध्ये तेलाचा वापर हा फ्रिजरमध्ये मोठ्या कामाचा आहे. तुम्ही एखादा पदार्थ भरून ते भांडं फ्रिजरमध्ये ठेवता. याशिवाय बर्फाचा ट्रेही ठेवता. तर या भांड्याला, बर्फाच्या ट्रेच्या तळाशी तेल लावण्याचा सल्ला या गृहिणीने दिला आहे. यासाठी तुम्ही वापर असलेल्या कोणत्याही कुकिंग ऑईलचा वापर करू शकतं. फक्त खोबरेल तेल वापरू नका, कारण ते गोठेल आणि समस्या कायम राहिलं, असं या गृहिणीने सांगितलं आहे. फक्त साधा पेपर वाचवेल वीज; फ्रिजच्या डोअरमध्ये अडकवा, कमी होईल लाइट बिल आता याचा फायदा काय? तर तुम्ही पाहिलं असेल, फ्रिजरमध्ये काही दिवसांनी बर्फ जमा होतो. या भांड्यांच्याभोवती आणि तळाशीही बर्फ असतो. या बर्फात ही भांडी चिकटतात. जेव्हा तुम्ही हे भांडं काढायला जाता तेव्हा ते सहजासहजी निघत नाही. थोडा जोर लावावा लागतो आणि ते खेचून काढावं लागतं. यामुळे बऱ्यादा भांड्यातील पदार्थही सांडतात. आता तुम्ही या भांड्याच्या किंवा बर्फाच्या तळाशी तेल लावून ते फ्रिजरमध्ये ठेवलं तर ते अशा पद्धतीने बर्फामुळे चिकटत नाही आणि सहजासहजी निघतंही. गृहिणीने स्वतः या व्हिडीओत भांड्याच्या तळाशी तेल लावण्याआधी आणि तेल लावल्यानंतर काय, कसा फरक पडतो हे दाखवलं आहे. Kitchen Jugaad : इस्त्रीची गरजच नाही, चहाच्या गाळणीने प्रेस करा कपडे; कसं ते पाहा VIDEO सिम्प्ली मराठी युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

हा जुगाड कितपत परिणामकारक ठरेल याची हमी न्यूज 18 लोकमत देत नाही. पण तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा काय परिणाम तुम्हाला पाहायला मिळाला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात