जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Kitchen Jugaad - कढईऐवजी तव्यावर एकाच वेळी बनवा भरपूर पुऱ्या; आठवडाभर गरमागरम खाल, पाहा Recipe Video

Kitchen Jugaad - कढईऐवजी तव्यावर एकाच वेळी बनवा भरपूर पुऱ्या; आठवडाभर गरमागरम खाल, पाहा Recipe Video

फोटो सौजन्य - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब

फोटो सौजन्य - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब

आठवडाभर खाता येतील अशा पुऱ्या तव्यावर बनवण्याची रेसिपी.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 मे : पुरी म्हटलं की ती गरमागरम खाण्यातच मजा आहे. पण काही वेळानंतर पुऱ्या थंड होतात आणि त्या खायला कंटाळा येतो. पण तुम्हाला एकदाच बनवून आठवडाभर गरमागरम पुऱ्या खायला मिळाल्या तर… पण हे कसं शक्य आहे, असं तुम्ही म्हणाल. यासाठी तुम्हाला पुऱ्या बनवण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. एका गृहिणीने पुऱ्यांचा हा जबरदस्त जुगाड दाखवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. एरवी तुम्ही कढईत पुऱ्या बनवता पण यावेळी तुम्हाला तव्यावर पुऱ्या बनवायच्या आहेत. तव्यावर एकाच वेळी तुम्ही भरपूर पुऱ्या बनवू शकता आणि याच पुऱ्या तुम्ही आठवडाभर गरमागरम खाऊ शकता. आता हे कसं शक्य आहे, असं तुम्ही म्हणाल. यासाठी हा पुऱ्यांचा रेसिपी व्हिडीओ पाहा.

News18लोकमत
News18लोकमत

यासाठी तुम्ही पुऱ्यांचं पीठ जसं मळता तसं मळून घ्या. गृहिणीने दिलेल्या टिपनुसार तुम्ही पीठ मळण्यासाठी दुधाचा वापर करू शकता यामुळे पुऱ्या नरमही होतात. शिवाय पुऱ्या लाटताना लाटणं गॅसवर थोडं शेकवून घ्या, म्हणजे पीठ लाटण्याला चिकटणार नाही आणि पुऱ्या लाटताना तेलाचीही गरज पडणार नाही. अशा पद्धतीने पुऱ्या लाटून घ्या. Kitchen Jugaad : तेल-तुपाऐवजी चपातीला लावा हार्पिक, आहे मोठा फायदा; काय ते VIDEO मध्ये पाहा आता गॅसवर तवा ठेवा. या तव्यावर मावतील इतक्या पुऱ्या ठेवा. या पुऱ्या दोन्ही बाजूंनी अशाच शेकवून घ्या. इथं तुम्हाला तेलाचा वापर बिलकुल करायचा नाही. दोन्ही बाजूंनी पुऱ्यांचा रंग थोडा बदलल्यावर त्या एका भांड्यात काढून थंड करून घ्या. त्यानंतर एका डब्यात भरून त्या फ्रिजरमध्ये ठेवा. आता तुम्हाला जेव्हा गरमागरम पुऱ्या खायच्या असतील तेव्हा फ्रिजमधील डब्यातील या पुऱ्या काढा आणि कढईत तेल घेऊन त्यात तळा. अगदी नेहमीच्या पुरीप्रमाणेच या पुऱ्याही टम्मं फुगतात आणि खुसखुशीतही होतात. Kitchen Jugaad - फ्रिजमध्ये तेलाची कमाल; नक्की लावा, काय परिणाम होतो पाहा VIDEO Pink’s Innovations युट्युब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत कॅप्शनमध्ये महिलेने या पुऱ्या 5-6 दिवस चालतील असं म्हटलं असेल तरी तिने व्हिडीओत सांगताना आठवडाभरही चालतील असं सांगितलं आहे.

पुरी बनवण्याच्या या पद्धतीची हमी न्यूज 18 लोकमत देत नाही. तुम्ही एकदा करून पाहा आणि पुऱ्या कशा झाल्या, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात