मोदींना पाणीपुरी खाताना पाहून जपानी राजदूतांनी काय केलं पाहा.
लखनऊ, 27 मे : पाणीपुरी म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. तुम्ही काय अगदी बडे बडे नेतेही पाणीपुरी खाण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पाणीपुरी खाल्ली होती. जपानच्या राजदूतांनी मोदींना पाणीपुरी खाताना पाहिलं आणि त्यांनाही राहवलं नाही. त्यानंतर त्यांनी जे केलं ते थक्क करणारं आहे. याचा व्हिडीओही त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. कित्येक पाश्चिमात्य नेते बऱ्याच भारतीय पदार्थांच्या प्रेमात पडले आहेत. याला पाणीपुरीही अपवाद नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत पाणीपुरीचा आस्वाद घेतला होता. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर याचे फोटो पोस्ट केले होते. हे फोटो जपानचे राजदूत हिरोशी सुझिका यांनी पाहिले आणि त्यांनाही पाणीपुरी खाण्याचा मोह आवरला नाही. 4 जूनपर्यंत चिकन-मटण काही खायला मिळणार नाही; इथं सरकारने घातली बंदी कारण… हिरोशी सध्या पंतप्रधान मोदींच्या लोकसभा मतदारसंघात आहेत. उत्तर प्रदेशच्या वाराणसीत ते गेलेत. तिथं त्यांनी बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर बनारसी थाळीचा आस्वाद घेतला. इतक्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी पाणीपुरीवरही चांगलाच ताव मारला. त्यांनी पाणीपुरी खातानाचा आपला व्हिडीओही आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट केला आहे. ज्यात ते पाणीपुरी खाताना दिसत आहेत. त्यांना पाणीपुरी खूप आवडली आहे. पाणीपुरी तोंडात टाकताच ती खाता खाता हातांनी ते छान असल्याचंही सांगत आहेत. PHOTOS: संसदेची नवीन इमारत उद्घाटनासाठी सज्ज; कसा आहे कार्यक्रम? फोटोंमधून झलक पाहा हिरोशी सुझुकीने ट्विटमध्ये म्हणाले, जेव्हापासून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान किशिदा यांना एकत्र गोलगप्प्यांचा आनंद घेताना पाहिले तेव्हापासून मलाही त्याचा आनंद घ्यावासा वाटत होता. काशीमध्ये झालेल्या भव्य स्वागताबद्दल त्यांनी सर्व भारतीयांचे आभारही मानले.
मार्चमध्ये दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी अनेक भारतीय स्ट्रीट फूड चाखले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह लस्सी, आंब्याचा पन्ना आणि पाणीपुरीचा आस्वाद घेतला