सरकारने मांस विक्रीवर काही दिवसांसाठी बंदी घातली आहे. राज्यातील सर्व मीटची दुकानं 27 मे 4 जूनपर्यंत बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
बाहेरून मांस आयात करण्याची परवानगी फक्त लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम, प्राणीसंग्रहायत प्राण्यांना खाण्यासाठी यापुरतीच असेल. यासाठी आधी विभागाची परवानगी घ्यावी लागेल.
माशांच्या विक्रीवर कोणत्याही प्रकारची बंदी नाही. माशांना या नियमातून सूट देण्यात आली आहे. पण धार्मिक भावनांचा सन्मान करत मासेही विकू नका, असं सरकारने म्हटलं आहे.
बौद्ध कॅलेंडरचा शुभ महिना सागा दावा सुरू झाला आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं धर्मशास्त्रीय विभागाने सांगितलं.
हा निर्णय लागू केला आहे तो सिक्कीम सरकारने. राज्यातील तिबेटियन लोक या बौद्ध कॅलेंडरचं पालन करतात. (सर्व फोटो प्रतीकात्मक - Canva)