मराठी बातम्या / बातम्या / Viral / आकाशात जाताच Hot Air Balloon पेटला; आगीचा विळखा वाढला अन् प्रवासी...; भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO

आकाशात जाताच Hot Air Balloon पेटला; आगीचा विळखा वाढला अन् प्रवासी...; भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO

हॉट एअर बलूनला आग

आकाशात जाताच हॉट एअर बलूनला आग लागली, या भयंकर दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.


वॉशिंग्टन, 02 मार्च :  आकाशात उंच उडायला कुणाला आवडणार नाही. माणसांना पक्ष्यांसारखे आकाशात उडण्यासाठी पंख नसले तरी बरीच साधनं आहेत, ज्यातून माणूस आकाशात उडण्याचा अनुभव घेतो. त्यापैकीच एक म्हणजे हॉट एअर बलून. अशाच एका हॉट एअर बलूनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आकाशात जाताच हॉट एअर बलूनला आग लागली आहे.

अमेरिकेच्या मेक्सिकोतील ही भय़ंकर दुर्घटना आहे. एका हॉट एअर बलूनला आग लागली. आकाशात जात अचानक बलून पेटला. बलूनमध्ये प्रवासी होते. ते जीव मुठीत धरून होते.  हळूहळू आगीने बलूनला विळखा घातला. आता प्रवाशांना काहीही करून जीव वाचवायचा होता. आगीतून फुफाट्यात अशी त्यांची अवस्था झाली होती. तरी त्यांनी मृत्यूपासून वाचण्यासाठी मृत्यूच्याच दारात स्वतःला झोकून देण्याचा धोका पत्करला.

ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

कसं शक्य आहे? मगरीच्या पोटातून जसाच्या तसा जिवंत बाहेर आला माणूस; आजवर कधीच पाहिला नसेल असा VIDEO

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा फुगा हवेत उडतो आहे. फुग्याच्या तळाशी असलेल्या बास्केटमध्ये अचानक आग लागली. या दरम्यान, वारा वाहू लागताच, वेगाने वाढणारी आग पेटू लागते. यादरम्यान प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली असून, स्वत:ला वाचवण्यासाठी प्रवासी खाली उडी मारतात.

माहितीनुसार, मेक्सिको सिटीजवळील प्रसिद्ध टिओतिहुआकान  स्थळावरील ही घटना आहे. टिओतिहुआकन हे सूर्य आणि चंद्राचे पिरॅमिड आणि त्याचा अव्हेन्यू ऑफ द डेड असलेले एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.

Video : अपघात कसा झाला? टेम्पो पलटी झाल्यावर ड्रायव्हरनेच लावला डोक्याला हात

या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यात एक पुरुष आणि एक महिला आहे.  तर एका मुलाचा चेहरा पूर्णपणे भाजल्याचं सांगितलं जातं आहे.

@Lerpc75 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या एक मिनिटाचा हा व्हिडीओ आहे. जो पाहून सर्वांना धडकी भरली आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published: April 02, 2023, 15:50 IST
top videos
  • Kolhapur News : घरातील शुभकार्याचे निमित्त साधून 'इथं' लावली जातात झाडे, वाढदिवस देखील केला जातो साजरा, Video
  • Pune News : दहावी आणि बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनो ॲडमिशनसाठी लगबग सुरू आहे? मग ‘या’ शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायला विसरू नका!
  • Pune News : पुण्याच्या लेकीची NDA मध्ये दमदार एन्ट्री, संपूर्ण देशात आली तिसरी, Video
  • Mumbai News : Rasika Sunil करणार Diet लग्न, मुहूर्तही ठरला! पाहा काय आहे प्रकार Video
  • Chhatrapati Sambhaji Nagar News : 15 वर्षांच्या मुलीने उभारली पुस्तकांसाठी मोठी चळवळ, संपूर्ण शहरात उभारलं नेटवर्क, Video
  • Tags:Fire, Viral, Viral videos

    ताज्या बातम्या

    सुपरहिट बॉक्स