साहेबराव कोकणे, अहमदनगर, 2 एप्रिल : आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दिवसभरात कुठून ना कुठून अपघाताची घटना समोर येत असते. अतिशय भयानक अपघातांचे व्हिडीओही सोशल मीडियावर खळबळ उडवतात. यामध्ये आणखी एका अपघाताची घटना समोर आलीये.
सध्या अहमदनगर येथून एक अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक टेम्पो भरधाव वेगाने रस्त्यावरुन चालला आहे. अचानक तो शेजारील विजेच्या खांबाला धडकतो आणि उंच उडून खाली कोसळतो. या अपघातात छोट्या टेम्पोची भयानक अवस्था झाली. हे पाहून आजपासचे नागरिकही शॉक झाले आणि इकडे तिकडे पळू लागले. पहिल्यांदा तर नेमका अपघात कसा झाला हेच समजलं नाही. नंतर गाडी विजेच्या खांबाला धडकल्याचं लक्षात आलं. अपघाताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अहमदनगरमध्ये वाहतूक रिक्षाचा अपघात, व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/aDBQVcLOeV
— sachin (@RamDhumalepatil) April 2, 2023
अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवर महावितरण कंपनीचा हा खांब धोकादायक बनला आहे. रस्ता रुंदीकरणानंतर हा खांब रस्त्यावर आला. वास्तविक तो तातडीने हलवायला पाहिजे. मात्र, त्यासाठी खर्च आणि तांत्रिक मुद्दे उपस्थित होत असल्याने त्याच्यासह अन्य खांबही रस्त्यावरच राहिले आहेत. यामुळे तेथे सतत अपघात होतात. किशोर ऑइल्स दुकानापुढील खांब तर सर्वाधिक धोकादायक ठरत आहे. तेथे अनेक अपघात झाले आहेत. वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना अचानक आडवा येणारा हा खांब लक्षात येत नाही. त्यामुळे वाहने त्यावर जाऊन आदळतात. आठवड्यातून एक-दोन तरी अपघात तेथे हमखास होतात.
दरम्यान, दुकानदार आणि रहिवाशांनी यासाठी महापालिका आणि वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केला. मात्र, उपयोग झालेला नाही. कालच तेथे आणखी एक अपघात झाला. वेगाने आलेला टेम्पो खांबवर धडकून पलटी झाला. चालकासह तिघे थोडक्यात बचावले. प्रशासन येथे कोणाचे बळी जायची वाट पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Social media viral, Video, Viral