जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कसं शक्य आहे? मगरीच्या पोटातून जसाच्या तसा जिवंत बाहेर आला माणूस; आजवर कधीच पाहिला नसेल असा VIDEO

कसं शक्य आहे? मगरीच्या पोटातून जसाच्या तसा जिवंत बाहेर आला माणूस; आजवर कधीच पाहिला नसेल असा VIDEO

मगर आणि माणसाचा व्हिडीओ व्हायरल.

मगर आणि माणसाचा व्हिडीओ व्हायरल.

मगरीच्या शरीरातून बाहेर येणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 01 एप्रिल :  मगर इतका खतरनाक प्राणी की तिच्यासमोर भलेभले प्राणीही टिकत नाही. सिंह, वाघ, बिबट्या अशा शक्तिशाली प्राण्यांचाही मगरीसमोर काही चालत नाही. एकदा का कुणी मगरीच्या तावडीत सापडलं तर त्याची सुटका अशक्यच. काही क्षणातच मगर आपल्या शिकाऱ्याला फस्त करते. अशाच मगरीच्या जबड्यात एक व्यक्ती स्वतःहून गेली. धक्कादायक म्हणजे या व्यक्तीला काहीच झालं नाही, ती जशीच्या तशी जिवंत त्या मगरीच्या शरीरातून बाहेर येताना दिसली. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. मगरीचे तसे तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील. पण असाच व्हिडीओ कधीच पाहिला नसेल. ज्या मगरीच्या जबड्यात गेल्यानंतर प्राणीही बचावले नाहीत, त्या मगरीच्या जबड्यातून चक्क माणूस जसाच्या तसा जिवंत बाहेर येताना दिसला. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. फक्त वाचून तुम्हाला यावर विश्वासच बसणार नाही, आता हे कसं शक्य झालं, ते तुम्ही व्हिडीओमध्येच पाहा.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक भलीमोठी मगर दिसते आहे. त्या मगरीच्या दोन्ही बाजूंनी दोन व्यक्ती उभ्या आहेत. एका व्यक्तीने तिची शेपटी धरली आहे. तर समोर असलेली व्यक्ती उभी आहे. अचानक मगरीच्या तोंडातून एक हात बाहेर येताना दिसतो, माणसाचा हा हात आहे. VIDEO - मगरीच्या पाठीवर बसून हिसकावला तिच्या तोंडचा घास; भुकेल्या मगरीने व्यक्तीला… थोड्या वेळाने मगरीचा जबडा उघडतो आणि त्यात संपूर्ण माणूसच दिसतो. हा माणूस त्या मगरीच्या शरीरात गेला आहे. पण त्याला काहीच झालं नाही आहे. तो जसाच्या तसा आहे आणि मगरीच्या तोंडातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे. समोर असलेल्या व्यक्तीला हात देतो. ती व्यक्ती त्याचा हात धरते आणि बाहेर खेचू लागते. आता मगरीच्या पोटात ही व्यक्ती जिवंत कशी काय? अशा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण जसं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं असं म्हणतात ना तेच या व्हिडीओच्या बाबतीतही लागू होतं.  तुम्ही व्हिडीओ नीट पाहा, तुम्हाला मगरीत काहीतरी वेगळं दिसेल.  Earth_animals_pix या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही रोबो क्रोकोडाइल आहे. VIDEO - पिकनिक स्पॉटवर आली मगर; शिकार सोडून जे पळवलं ते पाहून व्हाल थक्क ही मगर खरी नाही आहे, तर हा रोबो आहे. या रोबो क्रोकोडाइलच्या आत ही व्यक्ती गेली आणि त्यानंतर पुन्हा बाहेर येण्याचा प्रयत्न करून लागली.

जाहिरात

हा व्हिडीओ तुम्ही पहिल्यांदा पाहिला तेव्हा तुम्हाला ही मगर खरी वाटली की नाही? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात