पॅरिस, 13 ऑक्टोबर : बऱ्याच जणांना घरात पाळीव प्राणी पाळण्याची आवड असते. यात श्वान आणि मांजर हे प्राणी सर्वात जास्त पाळले जातात. फ्रेंचमधील अशाच एका प्राणी वेड्या कपलला एक मांजर पाळण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी ऑनलाइन चक्क 6 हजार युरो म्हणजेच (5 लाख रुपयांना मांजर खरेदी केली. मात्र जेव्हा डिलिव्हरी बॉक्स आला तो उघडून मात्र या कपलची झोप उडाली. मोठ्या उत्साहानं या कपलनं बॉक्स उघडला मात्र त्यात त्यांना मांजर नाही तर वाघाचं बछडं दिसलं. डेली मेलच्या वृत्तानुसार, नॉरमंडी येथील एका अज्ञात जोडप्यानं मांजरीसाठी एक ऑनलाइन जाहिरात पाहिली आणि त्यांनी मांजर विकत घेतली. मात्र जेव्हा घरात डिलिव्हरी बॉक्स आला तेव्हा त्यात मांजरीऐवजी तीन महिन्यांच्या वाघाचं बछडं होतं. वाचा- बर्गर खात असाल तर सावधान! या मुलाच्या जीभेची पाहा काय झाली अवस्था, पाहा VIDEO 2018 मध्ये मांजरीचं पिल्लू पाळल्यानंतर एका आठवड्यानंतर या जोडप्याला कळलं की ही मांजर नाही तर वाघ आहे. त्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांकडे संपर्क साधला. दोन वर्ष ही केस कोर्टात चालली होती, आता त्याचा निर्णय आला आहे. वाचा- ‘बाबा का ढाबा’नंतर केरळमधील पार्वती अम्माचा VIDEO VIRAL; मदतीसाठी नेटकरी सरसावले या जोडप्याने दावा केला की त्यांची मांजर खरंच इंडोनेशियातील सुमात्रा वाघ आहे हे त्यांना कळले नाही. मुख्य म्हणजे मांजर हा पाळीव प्राणी आहे, वाघाला पाळण्यासाठी योग्य कागदपत्रे आणि परवानगी लागते. त्यामुळे या जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वाचा- सलाम! छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत 68 वर्षांच्या आजींनी सर केला हरिहर गड स्थानिक वृत्तानुसार नुकत्याच या प्रकरणाचा तपशील समोर आला तेव्हा मांजर खरेदी केलेल्या जोडप्यासह नऊ जणांना अटक करण्यात आली. संरक्षित प्रजातींची तस्करी केल्याचा आरोप या दाम्पत्यावर ठेवण्यात आला होता आणि नंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले.