जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बर्गर खात असाल तर सावधान! या मुलाच्या जीभेची पाहा काय झाली अवस्था, भयंकर VIDEO VIRAL

बर्गर खात असाल तर सावधान! या मुलाच्या जीभेची पाहा काय झाली अवस्था, भयंकर VIDEO VIRAL

बर्गर खात असाल तर सावधान! या मुलाच्या जीभेची पाहा काय झाली अवस्था, भयंकर VIDEO VIRAL

या मुलाच्या जीभेची झालेली अवस्था पाहून तुम्ही बर्गर खाण्याआधी चार वेळा विचार कराल, पाहा VIDEO

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : बर्गर हा असा पदार्थ आहे जो लहान मुलांपासून मोठ्या पर्यंत सर्वांना आवडतो. पाश्चिमात्य देशांमध्ये या फास्ट फूडची जास्त क्रेझ आहे. मात्र एका व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही बर्गर खाण्याआधी चार वेळा विचार कराल. हा व्हिडीओमध्ये एका मुलानं भूक लागली म्हणून बर्गर ऑर्डर केले. या मुलाचे नाव कोबफ्रीमॅन आहे. बर्गर खाल्यानंतर त्याच्या जीभेची झालेली अवस्था पाहून सर्वच घाबरले. ही घटना यूटामधील असून वेबर युनिर्व्हसिटीमध्ये शिकणाऱ्या कोबानं स्वत:साठी बर्गर मागवले. बर्गर खाल्यानंतर तो बाहेर गेला, त्यानंतर पुन्हा येऊन त्यानं बर्गर खाण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याच्या जीभेची जळजळ होऊ लागली. वाचा- हेच बाकी राहिलं होतं! मास्क विसरली म्हणून महिलेनं तोंडाला लावलं सॅनिटरी पॅड

वाचा- 2 ट्रॅकमध्ये अडकून झाला व्हॅनचा चुराडा, ड्रायव्हरला मृत समजून उचललं आणि… जेव्हा कोबनं आरश्यात पाहिले तेव्हा तो हैराण झाला. कारण त्याच्या बर्गरमध्ये मधमाशी येऊन बसली होती. मधमाशीनं त्याच्या जीभेचा चावा घेतला, त्यामुळे त्याची जीभ सुजली. ही मधमाशी बर्गरमध्ये असल्याचे हा व्हिडीओमध्ये कोबनं सांगितले. कोबला बोलताही येत नव्हते. त्यानं काहीही फास्ट फूट खाण्याआधी चेक करा, असे सांगितले आहे. वाचा- सुसाट दुचाकी-कारची धडक; 2 फूट उंच उडून तरुण खाली पडला, पाहा थरारक VIDEO जेव्हा कोबनं जीभ पाहिली तेव्हा त्याची जीभ सुजली होती. त्याला काहीही खात येत नव्हते. बर्गर कंपनीची तक्रार करण्याची कोबना याचा व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे बर्गर खाताना जरा काळजी घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात