नवी दिल्ली 31 मार्च : दाक्षिणात्य अभिनेता राम चरण याच्यावरून दोन मुली एकमेकांशी भांडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली गणवेशात असल्याचं दिसतं आणि त्या एकमेकींचे केस ओढताना दिसतात. इतर वर्गमित्र भांडण थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ते व्यर्थ जातात. दोन्ही मुली RRR फेम अभिनेता राम चरणशी संबंधित कोणत्यातरी मुद्द्यावरुन एकमेकींसोबत भांडत केस ओढत आहेत. मुलगा पुढे बसलाय अन् चालू गाडीवर नवरा बायकोचं संतापजनक कृत्य, Video पाहून भडकले नेटकरी भांडणाचं नेमके कारण अद्याप समजलं नसलं तरी, व्हिडिओ आंध्र प्रदेशातील असल्याचं सांगितलं जात आहे. कारण मुली तेलुगूमध्ये बोलताना ऐकू येत आहेत. एका अभिनेत्यासाठी भांडल्याबद्दल सोशल मीडिया वापरकर्त्यांनी दोन्ही मुलींची खिल्ली उडवली. वापरकर्त्याने व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं, की “राम चरण या मुलींना त्यांच्या भांडणानंतर बक्षीस देईल आणि कौतुक करेल, असं दिसतं. याचमुळे दोघी एकमेकांचे केस ओढण्यास आणि डोकं फोडण्यासही तयार आहेत”
दुसर्या युजरने लिहिलं की, “सामान्यतः मुलींमध्ये फाईटिंग करताना क्रिएटिव्हिटी नसते, इंटरेस्टिंग फाईट नसते… तुम्हाला कंटाळा आला असेल तर एकदा ही फाईट बघा.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिलं, “हे पाहून आनंद झाला की त्यांचं भांडण सोडवण्यासाठी कोणता मुलगा मध्ये आला नाही.” या काकूंपुढे तर बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या; जबरदस्त डान्स VIDEO ने नेटकऱ्यांना लावलं वेड एका वापरकर्त्याने लिहिलं की, “केस खेचणं हे महिलांच्या लढाईत कायम असतं.” आणखी एका युजरने लिहिलं की, “दक्षिण चित्रपट छपरीचे चाहते.” हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर झाल्यानंतर सोशल मीडियावर मजेदार प्रतिक्रिया आल्या. ऑनलाइन शेअर केल्यापासून व्हिडिओला 400 हून अधिक लाईक्स आणि 50 हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत, तर तो 58,000 हून अधिक वेळा पाहिला गेला आहे.