मराठी बातम्या /बातम्या /Viral /या काकूंपुढे तर बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या; जबरदस्त डान्स VIDEO ने नेटकऱ्यांना लावलं वेड

या काकूंपुढे तर बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या; जबरदस्त डान्स VIDEO ने नेटकऱ्यांना लावलं वेड

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक घराबाहेर रस्त्यावर बसलेले दिसत आहेत, तर लाल साडीतील तीन महिला अनोख्या शैलीत नाचताना दिसत आहेत

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक घराबाहेर रस्त्यावर बसलेले दिसत आहेत, तर लाल साडीतील तीन महिला अनोख्या शैलीत नाचताना दिसत आहेत

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक घराबाहेर रस्त्यावर बसलेले दिसत आहेत, तर लाल साडीतील तीन महिला अनोख्या शैलीत नाचताना दिसत आहेत

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 30 मार्च : सोशल मीडियावर दररोज काही ना काही डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ खूप मजेदार असतात, तर काही शेअर होताच इंटरनेटवर व्हायरल होतात. सध्या देसी काकूबाईंच्या अशाच एका डान्सच्या व्हिडिओने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यामध्ये महिलांनी ग्रव्हिटीलाही न जुमानता अशा स्टेप दाखवल्या की सगळेच थक्क झाले. यामुळेच लोक हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा लूपवर पाहत आहेत.

नीट पाहा हा PHOTO, सोशल मीडियावर तुफान होतोय VIRAL; काय आहे कारण Watch Video

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक घराबाहेर रस्त्यावर बसलेले दिसत आहेत, तर लाल साडीतील तीन महिला अनोख्या शैलीत नाचताना दिसत आहेत. या दरम्यान महिला ३० अंश मागे वाकून नाचू लागतात. ही डान्स स्टेप पाहून लोक थक्क झाले आहेत. महिलांचा हा डान्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. इतकंच नाही तर लोक लूपमध्ये व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत.

View this post on Instagram

A post shared by (@pushpraj_writes_9000)

अजब शैलीत नाचतानाचा महिलांचा व्हिडिओ pushpraj_writes_9000 नावाच्या अकाऊंटवरुन इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं, अरे भाऊ, गुरुत्वाकर्षण कुठे गेलं? जेव्हापासून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, तेव्हापासून इंटरनेटवर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. व्हिडिओला आतापर्यंत 22,500 हून अधिक लोकांनी लाईक केलं आहे, तर अनेकांनी क्लिपवर कमेंट केल्या आहेत.

एका यूजरने लिहिलं, हा डान्स कुठला आहे भाऊ. त्याचवेळी दुसरा यूजर म्हणतो की, तुम्ही मायकल जॅक्सनच्या कुटुंबातील आहात का? आणखी एका यूजरने लिहिलं आहे की, ती मिथुन दादाची बहीण वाटते. आणखी एक यूजर म्हणतो, आंटी जी, जरा बघा, नाहीतर तुम्ही मागे पडाल. एकूणच या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे आणि लोक त्याचा आनंद घेत आहेत.

First published:
top videos

    Tags: Dance video, Videos viral