मराठी बातम्या /बातम्या /Viral /मुलगा पुढे बसलाय अन् चालू गाडीवर नवरा बायकोचं संतापजनक कृत्य, Video पाहून भडकले नेटकरी

मुलगा पुढे बसलाय अन् चालू गाडीवर नवरा बायकोचं संतापजनक कृत्य, Video पाहून भडकले नेटकरी

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

लग्नानंतर नवरा बायको आयुष्यभरासाठी एकमेकांचे साथीदार बनतात असं म्हटलं जातं. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत दोघे कायम सोबत असतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 30 मार्च : लग्नानंतर नवरा बायको आयुष्यभरासाठी एकमेकांचे साथीदार बनतात असं म्हटलं जातं. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत दोघे कायम सोबत असतात. सुख-दुःखात, चांगल्या वाईटात नवरा बायको खंबीरपणे एकमेकांची साथ देतात. दोघेही प्रेमात एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. आत्तापर्यंत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये नवऱ्याने बायकोसाठी किंवा बायकोने नवऱ्यासाठी काहीतरी केलंय. मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुमच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाही.

सध्या नवरा बायकोचा एक हटके व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक नवरा बायको आणि मुलगा दुचाकीवर चालले आहेत. आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे, नवरा गाडी चालवत आहे आणि बायको त्याला सिगारेट ओढण्यासाठी मदत करत आहे. भररस्त्यात चालू असलेला हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. या कृत्याने सध्या सोशल मीडियावर तुफान खळबळ उडाली आहे.

Adult Compan नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अगदी काही वेळात हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. एवढंच नाही तर व्हिडीओवर भरपूर कमेंटचा पाऊसदेखील पहायला मिळत आहे. हा प्रकार पाहून अनेकजण संताप व्यक्त करत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर असे प्रकार सर्रास पहायला मिळतात. तरुणांचे असे अनेक व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधत असतात. मात्र यावेळी नवरा बायकोचा हा प्रकार पाहून नेटकरीही अवाक् झाले.

First published:
top videos

    Tags: Social media troll, Top trending, Videos viral, Viral, Wife and husband