JOIN US
मराठी बातम्या / Viral / OMG! आधी धूर आला मग आग भडकली अन् क्षणात झाला विस्फोट, बर्निंग कारचा थरारक VIDEO

OMG! आधी धूर आला मग आग भडकली अन् क्षणात झाला विस्फोट, बर्निंग कारचा थरारक VIDEO

कारमध्ये असलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्यामुळे ही आग आणखीन भडकली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

झांसी, 05 नोव्हेंबर : रस्त्याच्या कडेला असलेल्या ओमनी कारमधून आधी धूर येऊ लागला आणि त्यानंतर अचानक आग लागले दुसऱ्या क्षणी मोठा स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नुसताच जाळ आणि धूर नाही तर मोठा स्फोट झाल्यामुळे गाडीचे तुकडे उडाले आहेत. दिवसाढवळ्या बर्निग कारचा हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील झांसी इथे ही घटना घडली आहे. बरुआसागर राजमार्गावर ओमनी कारमध्ये स्फोट झाला. यामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तर कारचे तुकडे उडून दूरवर पडले. या भीषण घटनेत कार जळून खाक झाली आहे. याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेमुळे रस्त्याच्या दोन्ही दिशेनं वाहनांच्या काही काळ लांब रांगा लागल्या होत्या.

हे वाचा- बिहारमधील मोठी दुर्घटना, गंगा नदीत बोट बुडाली; 15 जण बेपत्ता ही ओमनी कार बरुआ इथून झासीमध्ये जात असताना हा भीषण दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कारमध्ये असलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्यामुळे ही आग आणखीन भडकली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. कारला आग लागल्यानंतर गाडीत असलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की आगीचे उंच लोळ उठले आणि स्फोटाचा भयंकर आवाजही झाला. या घटनेमुळे परिसरात काहीवेळ मोठी खळबळ उडाली होती. मात्र पोलीस आणि अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या