बिहारमधील मोठी दुर्घटना, गंगा नदीत बोट बुडाली; 15 जण बेपत्ता

या बोटीवर 50 पेक्षा जास्त लोकं स्वार होती. बोट बुडल्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन 30 लोकांना वाचवले आहे.

या बोटीवर 50 पेक्षा जास्त लोकं स्वार होती. बोट बुडल्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन 30 लोकांना वाचवले आहे.

  • Share this:
    राहुल कुमार ठाकुर, प्रतिनिधी भागलपूर, 05 नोव्हेंबर : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची (bihar assembly election 2020) धामधूम सुरू आहे. अशातच भागलपूर परिसरात गंगा नदीत(River Ganga) प्रवाशांनी भरलेली बोट (boat )उलटल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 15 जण बेपत्ता झाले आहे. तर आणखी काही जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर येथील गोपालपूर तीनटंगा जहाज घाटाजवळ ही दुर्घटना घडली आहे. या बोटीवर 50 पेक्षा जास्त लोकं स्वार होती. बोट बुडल्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन 30 लोकांना वाचवले आहे. यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. आतापर्यंत 15 ते 20 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळावर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. पुण्यात नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात, पाहा हा VIDEO गोपालपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या तीनटंगा दियारा जहाज घाटावर काही मजूर आणि शेतकरी हे एका खासगी बोटीने शेतावर काम करण्यासाठी चालले होते. परंतु, बोटीत मर्यादेपेक्षा जास्त लोकं असल्यामुळे या बोट दुर्घटनाग्रस्त झाली, अशी माहिती समोर आली आहे. बोट बूडत असताना काही जणांनी नदीत उडी मारून आपला जीव वाचवला तर काही जणांना स्थानिक मच्छीमारांनी वाचवले आहे. अजूनही अनेक जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. जुनी द्या अन् नवी गाडी घ्या, सरकारकडून स्पेशल सूट, जाणून घ्या काय आहे प्लान या बोटीवर मर्यादेपेक्षा जास्त लोकं होती. आतापर्यंत या घटनास्थळावरून 30 पेक्षा जास्त लोकांना वाचवण्यात यश आले आहे. आतापर्यंत एका महिलेचा मृतदेह हा सापडला आहे. अजूनही शोधकार्य सुरू आहे. जखमी लोकांना गोपालपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान पोहोचले आहे. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.
    Published by:sachin Salve
    First published: