JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - नवरदेव वरात घेऊन दारात अन् धावत बाल्कनीत गेली नवरी; पुढे असं काही घडलं की...

VIDEO - नवरदेव वरात घेऊन दारात अन् धावत बाल्कनीत गेली नवरी; पुढे असं काही घडलं की...

नवरदेव येताच नवरीने असं काही केलं की हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

लग्नाचा व्हिडीओ.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 एप्रिल :  लग्ना चे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक नवरदेव लग्नाची वरात घेऊन नवरीच्या दारात आला. त्यानंतर नवरीने असं काही केलं की हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वरात दारात येताच नवरीबाई धावत बाल्कनीत गेली. त्यानंतर असं काही घडलं की कुणी तरी ते कॅमेऱ्यात कैद केलं आणि हा व्हिडीओ चर्चेत आला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वधू लाल रंगाचा ड्रेस घालून धावताना दिसते आहे. धावत ती बाल्कनीच्या दिशेने जाते आणि तिथं उभी राहते. तिच्या मागोमाग काही तरुणही धावत येतात. सर्वजण बाल्कनीत येत ओरडताना दिसतात. त्यानंतर या नवरीने बाल्कनीत जाऊन जे केलं ते थक्क करणारं आहे.

व्हिडीओत तुम्ही ऐकू शकता नवरी आणि इतर तरुण नवरा आला, नवरा आला म्हणतो ओरडत येतात. ही नवरीबाई आपल्या वराला पाहण्यासाठी किती उत्सुक आहे हे पाहून स्पष्टपणे समजू शकतं. VIDEO - बिच्चारा जावई! तोऱ्यात सासरी आला, पण झाला असा पाहुणचार की पुन्हा फिरकणारही नाही त्यानंतर ते चिनू-चिनू ओरडते. चिनू म्हणजे तिचा होणार नवरा. चिनू आवाज ऐकू येताच नवरदेवाचं लक्ष त्या आवाजाच्या दिशेने जातं. तोसुद्धा वर पाहतो. नवरा-नवरीची नजरानजर होताच दोघंही एकमेकांना हातवारे करतात. नवरीबाई त्याल फ्लाइंड किस देत, हाय माझा नवरा, असंही म्हणते. लग्नमंडपात जाण्याआधी आपल्या नवरदेवाला किंवा नवरीला एकदा तरी पाहावं, असं अनेकांना वाटतं. ही नवरीसुद्धा नवरदेवाला लग्नाआधी पाहण्यासाठी उतावळी होती. त्यासाठी जसा वरातीच्या बँडबाजाचा आवाज तिच्या कानावर पडला. तशी तिने बाल्कनीकडे धाव घेतली. नवरदेव आणि वरात पाहून ते खूप आनंदी झाली आहे. हा आनंद तिने व्यक्त करून दाखवला आहे. पाहताच नवरदेवाने शरमेने बंद केले डोळे, नवरीही स्तब्ध; भरमंडपात स्क्रिनवर दिसला त्यांचा Private Video हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यावर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या