जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पाहताच नवरदेवाने शरमेने बंद केले डोळे, नवरीही स्तब्ध; भरमंडपात स्क्रिनवर दिसला त्यांचा Private Video

पाहताच नवरदेवाने शरमेने बंद केले डोळे, नवरीही स्तब्ध; भरमंडपात स्क्रिनवर दिसला त्यांचा Private Video

लग्नात आपला 'तो' व्हिडीओ पाहून नवरा-नवरी शॉक

लग्नात आपला 'तो' व्हिडीओ पाहून नवरा-नवरी शॉक

लग्नात वधू-वराचं प्री-वेडिंग दाखवताना त्यांचा नको तो व्हिडीओ प्ले झाला आणि दोघांनाही मोठा झटका बसला.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 02 एप्रिल : हल्ली प्री- वेडिंग म्हणजे ट्रेंड झाला आहे. प्री-वेडिंगचा हा व्हिडीओ लग्नाच्या दिवशी मंडपात मोठ्या स्क्रिनवर दाखवला जातो. अशाच एका लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात प्री-वेडिंग दाखवलं जात होतं. पण प्री-वेडिंग दाखवताना भलताच व्हिडीओ दिसला, जो पाहून नवरा-नवरी दोघंही शॉक झालेत. नवरा-नवरीचा लग्नाआधीचा तो प्रायव्हेट व्हिडीओ सर्वांसमोर आला. जो पाहून दोघांनाही लाज वाटली. लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. नवरा-नवरीचा प्री-वेडिंगमधील जो सीन नको दिसायला हवा होता, तोच अचानक त्यांना दिसला, तोसुद्धा सर्वांसमोर त्यामुळे त्यांनाही शरम वाटली. नवरदेवाने तर अक्षरशः आपले डोळेच मिटून घेतले आणि नवरी तर ते दृश्य पाहून स्तब्ध झाली. दोघांच्याही चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरा-नवरी मंडपात दिसत आहेत. त्यांच्या गळ्यात वरमाला दिसत आहेत, म्हणजे लग्नाच्या काही विधी झाल्या आहेत. ते दोघं एकमेकांसोबत उभे आहेत. इतक्या त्यांच्यासमोर असलेल्या एका मोठ्या स्क्रिनवर एक व्हिडीओ प्ले होतो. हा व्हिडीओ त्या दोघांच्या असतो. व्हिडीओ पाहून त्यांना धक्काच बसतो. लग्नात फोटोसाठी अशी पोझ देणं पडलं भारी, भरमंडपात नवरीसोबत भयंकर घडलं; VIDEO VIRAL कारण ते दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात आणि एकमेकांना किस करताना दिसतात. त्यांचा तो खासगी क्षण असा सर्वांसमोर येतो. त्यानंतर लग्नात आलेले सर्वजण पटापट आपल्या खिशातील मोबाईल बाहेर काढतात आणि वधू-वराचा हा खासगी क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करू लागतात. हे पाहिल्यानंतर नवरदेवाचा चेहरा पाहा. त्याला राग आल्याचं आणि लाज वाटल्याचं दिसतं आहे. त्याने असं काहीतरी पाहण्यापेक्षा आपले डोळेच बंद करून घेतले. नवरीलाही जबर झटका बसल्याचं दिसतं. ते टकमक त्या व्हिडीओकडे पाहत राहते, कसं रिअॅक्ट व्हावं हे तिलाही समजत नाही आहे, ती तसंच व्हिडीओकडे पाहत स्तब्ध उभी आहे. हे फनी बिलकुल नाही! भरमंडपात नवरदेवाने नवरीसोबत केलं असं काही की VIDEO पाहून नेटिझन्स संतप्त इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही युझर्सनी वधू-वरासोबत असं घडायला नको होतं, असं म्हटलं आहे. तर काही जणांनी याची मजा घेतली आहे.

जाहिरात

तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात