मुंबई, 02 एप्रिल : सासरी जावयाला खूप मान असतो. जावई येणार म्हटल्यावर सासरी अगदी जोरात तयारी सुरू असते. जावईबापूंच्या आवडीनिवडी लक्षात घेऊनच सर्व गोष्टी केल्या जातात. जावयाचं पंचपक्वान, टेबल भरेल इतक्या पदार्थांनी सासरच्यांनी स्वागत केल्याचे व्हिडीओही तुम्ही पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर जावयाच्या पाहुणचाराचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.
जावयाचं पंचपक्वानाने स्वागताचे व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला तसं सासर हवंहवंसं वाटलं असेल, पण जावयाच्या पाहुणचाराचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर असं सासर असेल तर लग्नच नको, असं वाटेल. या जावयासोबत सासरच्यांनी जे केलं, त्यानंतर कदाचित या जावईही आता पुन्हा आपल्या सासरी फिरकणार नाही. सासरच्यांनी त्याची इतकी वाईट अवस्था केली आहे.
असं सासरी या जावयासोबत काय घडलं ते पाहुयात. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती हातात भांडी घेऊन बसला आहे, त्याच्या खांद्यावर शाल आहे. त्याच्या आजूबाजूला काही मुलं आहेत. एक महिला त्या व्यक्तीच्या केसावर तेल लावते आहे. तेलाने तिने त्याला अक्षरशः अंघोळच घातली आहे, असं म्हणायला हरकत नाही. केसांवरून त्याचं तेल ओघळत त्याच्या तोंडावर आलं आहे.
पाहताच नवरदेवाने शरमेने बंद केले डोळे, नवरीही स्तब्ध; भरमंडपात स्क्रिनवर दिसला त्यांचा Private Video
त्याचा चेहरा पाहाल तर तुम्हाला धक्काच बसेल. त्याचा चेहराही पूर्णपणे काळा केला आहे. डोळ्यात आणि तोंडावर काजळ लावलं आहे. त्यात केसांना लावलेलं तेलही त्याच्या चेहऱ्यावर आलं आहे, त्यामुळे तो आणखी भयानक दिसत आहे. तेल-काजळ लावून जावयाचा त्यांनी माकड केला आहे. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहिले तर तो त्रस्त झालेला दिसतो आहे. अशा पाहुणचाराला तो वैतागला आहे. त्याच्या आजूबाजूला असलेली मुलं मात्र त्याची मजा घेत आहेत. तसं त्या मुलांच्या चेहऱ्यालाही काजळ-पावडर लावल्याचं दिसत आहे.
आपल्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी लग्नाच्या वेगवेगळ्या विधी, प्रथा, परंपरा असतात. कदाचित हीसुद्धा कोणत्या तरी एका ठिकाणची प्रथा असावी. ही प्रथा नेमकी कुठली आहे ते माहिती नाही. satyamtripathi7072 इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
हे फनी बिलकुल नाही! भरमंडपात नवरदेवाने नवरीसोबत केलं असं काही की VIDEO पाहून नेटिझन्स संतप्त
व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेकांनी अशी विधी नसावी असं म्हटलं आहे.
View this post on Instagram
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं? यावर तुमचं मत काय? या प्रथेबाबत तुम्हाला काही माहिती आहे का? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Funny video, Social media, Viral, Viral videos, Wedding, Wedding video