JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - आलिया गावात अजब वरात! कार-घोड्याऐवजी नवरा-नवरी चक्क गाढवावर, कारण...

VIDEO - आलिया गावात अजब वरात! कार-घोड्याऐवजी नवरा-नवरी चक्क गाढवावर, कारण...

अजब लग्नाचा गजब व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

नवरा-नवरी गाढवावर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कराची, 18 मार्च : लग्न म्हटलं की कार किंवा घोडा यावरून लग्नाची वरात आली. यावरूनच नवरा-नवरीची लग्नात हटके एंट्री पाहायला मिळते. पण सध्या अशा लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात नवरा-नवरी कार, घोड्यावर नव्हे तर चक्क गाढवावरून आले आहेत. या अजब लग्नाचा गजब व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. लग्नाच्या हटके एंट्रीचे किंवा वरातीचे तसे तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील. कुणी बाईकवर, कुणी रथावर, कुणी तर बुल्डोझरवरही बसून आलं आहे. पण तर कुणी कधी गाढवावर बसण्याचा विचार तरी करेल का? तेसुद्धा वधू-वर. लग्नाचा क्षण प्रत्येकासाठी खास असतो, त्यामुळे काहीतरी वेगळं करण्याच्या नादात नक्कीच कुणी गाढवावर बसून आपल्या लग्नाची वाट लावणार नाही. पण आपल्याला कल्पनाही नकोशी वाटते, तेच या कपलने केलं. ‘तिची कस्टडी मला द्या’, विवाहित GF साठी BF ची पुराव्यासह कोर्टात धाव; प्रकरणाचा निकाल काय पाहा नवरा-नवरीच्या फक्त हटके नव्हे तर विचित्र एंट्रीमुळे या व्हिडीओ बराच चर्चेत आला आहे.   व्हिडीओत तुम्ही पाहू शकता वर-वधू एका गाढवगाडीवर बसले आहेत. म्हणजे गाढव ही गाडी खेचतो आहे. त्यांच्या आजूबाजूला बरेच लोक आहेत. गाढवावरून एंट्री करताना नवरा-नवरी एकदम आनंदात आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे.

@pakistan_glitz इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. लग्नाचा हा व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानातील असल्याचं सांगितलं जातं आहे. ‘ब्रेकअप के बाद’ व्हाल मालामाल; तुम्ही तुमचं Heartbreak Insurance काढलंय का? हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या कपलने गाढवावरून का एंट्री केली असेल, याबाबत आपापली मतं मांडली आहेत. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही युझर्सच्या मते, हे सर्व प्रसिद्धीसाठी केलं जात आहे. तर काही युझ्रस्च्या मते, पाकिस्तानातील वाढत्या महागाईमुळे असं केलं असेल.

संबंधित बातम्या

तुम्हाला काय वाटतं? या कपलने लग्नात गाढवावरून एंट्री का घेतली असेल? तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या