प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 14 जून : हल्ली जवळ-जवळ प्रत्येक घरात आपल्याला वॉशिंग मशीन सहाजिकच पाहायला मिळते. यामुळे लोकांचं सर्वात मोठं काम हलक होतं. मुख्यता वर्किंग वुमनसाठी वॉशिंग मशीन वरदानापेक्षा कमी नाही. कारण यामुळे कपडे धुण्यासाठी त्यांचा खूप वेळ वाया जातो. पण हिच वॉशिंग मशीन एका महिलेसाठी मृत्यूचा सापळा बनली. काम हलकं करण्यासाठी वापर असलेल्या वॉशिंग मशीनमुळे महिलेचा मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली. ज्यानंतर ही बातमी संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली आहे. हॉटेलमध्ये राहताना बेडखाली नक्की फेका पाण्याची बाटली, तरच रहाल सुरक्षित, नक्की हा प्रकार काय? ही घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील आहे. येथील खेरी पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या हरकेश राय यांच्या पत्नीचा वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या प्रकरणाबद्दल हरकेश राय यांनी सांगितलं की, सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांची पत्नी निशी राय या वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुत होत्या. दरम्यान, वॉशिंग मशिनच्या आतमध्ये त्या कपडे काढण्यासाठी वाकल्या, त्यावेळेला मशीला करंट लागत होतो. ज्यामुळे निशी राय यांना तो करंट लागला आणि त्या तेथेच अडकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. हे धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर लोकांमध्ये वॉशिंग मशिनबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अनुषंगाने आम्ही मोठ्या इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकाशी चर्चा केली आणि वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे हे तुम्हाला ही लक्षात येईल. Shocking news : हनिमूनच्या दुसऱ्या दिवशी बेडवर नवरा-बायकोचा मृतदेह, Postmortem रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा राजेश इलेक्ट्रॉनिकचे मालक राजेश गुप्ता यांनी सांगितले की, वॉशिंग मशिन वापरताना सर्वप्रथम अर्थिंगची काळजी घ्या. वॉशिंग मशिनचे अर्थिंग पूर्णपणे योग्य असावे. वॉशिंग मशिनमधील विद्युतप्रवाह कमी झाला तरी वॉशिंग मशीन आपोआप बंद होईल. राजेश म्हणाले की, अर्थिंग व्यतिरिक्त दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वॉशिंग मशीन जमिनीवर ठेवून कपडे कधीही धुवू नका. वॉशिंग मशिनखाली लाकडी किंवा लोखंड नसलेले कोणतेही स्टँड ठेवा. यामुळे वॉशिंग मशीनच्या आजूबाजूला पाणी असले तरी विद्युत प्रवाह वॉशिंग मशीनला स्पर्श करणार नाही. तिसरा आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वॉशिंग मशिनमध्ये हात घालण्यापूर्वी ती पूर्णपणे बंद करा. शक्य असल्यास, त्याची वायर स्विच बोर्डमधून काढा. या तीन महत्त्वाच्या खबरदारी घेतल्यास सर्व प्रकारच्या घटना आणि अपघात टाळता येतात.