जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking news : हनिमूनच्या दुसऱ्या दिवशी बेडवर नवरा-बायकोचा मृतदेह, Postmortem रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

Shocking news : हनिमूनच्या दुसऱ्या दिवशी बेडवर नवरा-बायकोचा मृतदेह, Postmortem रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

सोर्स : सोशल मीडिया

सोर्स : सोशल मीडिया

या प्रकरणात लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधू आणि नवरदेवाचा मृतदेह बेडवर सापडला. ज्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. नक्की काय घडलं असेल?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 04 जून : लग्न म्हणजे प्रत्येक मुलगा-मुलगीसाठी स्वप्नापेक्षा कमी नाही. खरंतर या दिवसानंतर त्यांच्या आयुष्याची नव्याने ओळख होते. नवीन जोडीदार त्याच्यासोबतची नवीन सुरुवात या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी फार नव्या असतात. शिवाय लग्नाची पहिली रात्र किंवा मधूचंद्र देखील प्रत्येक नवरा-बायकोसाठी खास असतो. पण एक अशी बातमी समोर आली आहे. ज्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल. खरंतर या प्रकरणात लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधू आणि नवरदेवाचा मृतदेह बेडवर सापडला. ज्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. नक्की काय घडलं असेल? या जोडप्यासोबत असं काय घडलं? घरी चोर घुसले होते का? असे अनेक प्रश्न गावकऱ्यांच्या मनात उपस्थीत होऊ लागले. पण खरं कारण कोणालाच माहिती नव्हतं. अखेर जेव्हा या जोडप्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. लग्नाचा मंडप क्षणात झाला कुस्तीचं मैदान, नववधू-नवरदेवाच्या मारामारीचा Video Viral उत्तर प्रदेशातील बहराइचमधील ही घटना आहे. इथे हनिमूनच्या दिवशी सकाळी वधू आणि वर दोघेही बेडवर मृतावस्थेत आढळले. यानंतर घरात गोंधळ उडाला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम केले. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार वधू-वराचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. पोस्टमॉर्टमनंतर नवविवाहित जोडप्याला एकाच चितेवर एकत्र दहन करण्यात आले. बायको प्रियकरासोबत बेडवर असताना कॅमेरा घेऊन पोहोचला नवरा आणि… Video कैद झाला संपूर्ण प्रकार मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कैसरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील गोधिया नंबर चार गावातील 22 वर्षीय प्रताप यादव 30 मे 2023 रोजी परिसरातील मंगल मेळा गावात लग्न झाले होते. घरातील महिलांनी मंगल गीते गाऊन वधू-वरांचे स्वागत केले. रात्री उशिरापर्यंत घरात जल्लोष सुरू होता. यानंतर दुसऱ्या दिवशी दोघांचे मृतदेह बेडवर सापडले. यानंतर घरात गोंधळ उडाला. एसपी प्रशांत वर्मा यांनी सांगितले की, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये पती-पत्नी दोघांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पण नक्की हे कशामुळे घडलं किंवा दोघांना एकाचवेळी हार्ट अटॅक कसा आला? असा प्रश्न उपस्थीत होत आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात