सोर्स : गुगल
मुंबई : माणसाच्या आयुष्यात वेळेला खूप महत्व आहे. शहरातील लोकांच तर घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे आयुष्य धावत असतं. गाडी पकडणे, ऑफिसला पोहोचणं या सगळ्यासाठी वेळ महत्वाचा आहे. शिवाय थोरामोठ्यांनी ही सांगितलं आहे की वेळेची ज्या व्यक्तीला किंमत आहे, त्या व्यक्तीला आयुष्यात पुढे जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. पण जरा विचार करा की तुमच्या आयुष्यातील एक तास गायब झाला तर? किती पंचायत होऊन बसेल. ज्याचा आपण विचार देखील करु शकत नाही, ती गोष्टी एका शहरात घडत आहे. जगातील असं एक शहर आहे जिथे ११ नंतर १२ वाजत नाहीत, तर थेट १ वाजतो. आता हे शहर कोणते आणि त्याबद्दल जाणून घेण्यासाठी तुमच्या मनात उत्सुक्ता वाढली असले. तसेच इथे असं का केलं जात आहे? हा प्रश्न पण पडला असेल. चला या शहराबद्दलची रंजक माहिती जाणून घेऊ. अखेर 20 वर्षानंतर उलगडलं एलियनच्या सांगाड्याचं रहस्य, नक्की हा प्रकार काय? स्वित्झर्लंडमधील सोलोथर्न शहराचे घड्याळ स्वित्झर्लंडच्या सोलोथर्न शहरातील घड्याळ 11 नंतर थेट एकावर धडकतो. याचे कारण म्हणजे या शहरातील लोकांचे 11 क्रमांकाशी असलेले विशेष आकर्षण. त्यामुळे 11 वाजल्यानंतर त्याचा दिवस संपतो. या प्रथेमुळेच येथील घड्याळात 11 नंतर 12 लिहिले जात नाही.
सकाळी उठल्यावर लोक सर्वात आधी घड्याळाकडे पाहून दिवस सेट करणाऱ्या भारतीयांच्या आयुष्यातील एक तास कमी झाला तर विचार करा की काय होईल.