मराठी बातम्या /बातम्या /Viral /अखेर 20 वर्षानंतर उलगडलं एलियनच्या सांगाड्याचं रहस्य, नक्की हा प्रकार काय?

अखेर 20 वर्षानंतर उलगडलं एलियनच्या सांगाड्याचं रहस्य, नक्की हा प्रकार काय?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

ऑस्करला एका चामड्याच्या पिशवीत ठेवलेली ममी आढळून आली, ज्याला रिबनने पांढऱ्या कपड्यात गुंडाळले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : इतिहासातील अशा काही घटना आहेत, ज्याबद्दल जाणून अनेकांना विश्वास बसत नाही. पण आपला विश्वास असो न असोत. त्या कुठे तरी घडलेल्या असतात. ज्याबाबतचे अनेक पुरावे इतिहासकार देतात. इतिहासात दडलेल्या अशा काही घटना देखील आहेत, ज्या कालांतराने समोर येतात. असंच एक प्रकार सध्या समोर आला आहे.

ही घटना चीलीमधील आहे आणि 20 वर्षांपूर्वी चिलीमध्ये 6 इंचाचा सांगाडा सापडला होता. जगाला तो एलियनचा सांगाडा वाटला.

अनेकवेळा हे गूढ उकलण्याचे दावे करण्यात आले, मात्र ते उकलण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचे होत गेले. आता 20 वर्षांनंतर शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा त्याचे गूढ उकलल्याचा दावा केला आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

प्रवाशांनी भरलेली ट्रेन बोगद्यात शिरताच गायब, याचं गुढं आजपर्यंत उलगडलं नाही

चिलीच्या वाळवंटात 2003 मध्ये अशी विचित्र ममी सापडली होती. ते कोणत्याही मोठ्या व्यक्तीचे नसून फक्त 6 इंचाच्या मुलाचे होते. अटाकामा वाळवंटात सापडलेल्या या ममीला तेव्हा एटाह असे नाव देण्यात आले. खजिनाच्या शोधात असताना ऑस्कर मुनोने याचा शोध लावला.

त्यावेळी ऑस्करला एका चामड्याच्या पिशवीत ठेवलेली ममी आढळून आली, ज्याला रिबनने पांढऱ्या कपड्यात गुंडाळले होते. तेव्हापासून या सांगाड्याने शास्त्रज्ञांना चक्रावून सोडलं. त्याच्या शरीराला 10 बरगड्या होत्या, परंतु बहुतेक माणसांना 12 बरगड्या असतात. सांगाड्याची मोठी कवटी आणि विलक्षण पोत पाहून ते एलियन्सशीही जोडले गेले होते. तसेच तो एक गर्भ असू शकतो असेही अनेकांना वाटत होते.

सुरुवातीच्या संशोधनात याबद्दल फारशी माहिती मिळाली नाही. डीएनए चाचणी केली असता या मुलामध्ये जनुकीय उत्परिवर्तन झाल्याचे आढळून आले. मणक्याचे एका बाजूला बौनेत्व आणि वक्रता हे त्यापैकी एक होते. 2013 मध्ये एलियनवर एक डॉक्युमेंट्री बनवण्यात आली होती, तेव्हापासून तो एलियन असावा असं मानलं जात होतं.

चौकशी सुरू झाली. जगभरातील शास्त्रज्ञ रिंगणात उतरले. हा छोटासा सांगाडा फार जुना नसून 1970 च्या दशकातील असल्याचे आढळून आले.

2018 मध्ये एक अभ्यासही समोर आला, पण तो उकलण्याऐवजी गूढ वाढला. असे म्हटले जात होते की, खरं तर हा एका मुलीचा सांगाडा आहे, जी अनेक अनुवांशिक दोषांमुळे अशी झाली होती. जगभरातील सर्व शास्त्रज्ञांनी ते मान्य केले नाही.

नवीन अभ्यासात काय म्हटले आहे...

आता एक नवीन अभ्यास समोर आला आहे, ज्यामध्ये या सांगाड्याचे गूढ उकलण्याचा दावा केला जात आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आणि सॅन फ्रान्सिस्को येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा दावा आहे की हा सांगाडा 40 वर्षांपूर्वी मरण पावलेल्या मुलाचा आहे.

या ममीची शरीराची असामान्य रचना आहे कारण त्याला अनेक अनुवांशिक समस्या होत्या, ज्यामुळे हाडांची रचना बिघडली होती. संशोधनात सात जनुकांमध्ये अनेक उत्परिवर्तन दिसून आले, ज्यामुळे हाडे, चेहरा आणि शरीरात थोडे बदल दिसून येते. जे सामान्य माणसासारखे नाही. ही असामान्य वाढ कधीकधी कर्करोगाचे कारण असू शकते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की बाळाचा जन्म झाल्यानंतर लगेचच मृत्यू झाला. तसेच या बाळाचा अकाली जन्म झाला असावा.

First published:
top videos

    Tags: Local18, Shocking, Social media, Top trending