गुवाहटी, 25 नोव्हेंबर : आसाममधील तेजापूर युनिव्हर्सिटीजवळ (Tezpur University) एक भयंकर प्रकार घडला. रस्ता भटकलेल्या एका वाघानं स्थानिक लोकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. वाघाला पाहण्यासाठी गेलेल्या लोकांनावर या वाघानं हल्ला केला. मंगळवारी, काझीरंगा नॅशनल पार्कमधील (Kaziranga National Park) या थरारक व्हिडीओनंतर आसपासच्या भागात खळबळ उडाली आहे. रस्ता भटकलेल्या या वाघानं केलेल्या हल्ल्यात दोन लोक जखमी झाले, त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काझीरंगा नॅशनल पार्कच्या दिशेने वाघाला बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सुरू केले. परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- प्राणीपालकांनी खोडकर प्राण्यांचे चाळे प्रसिद्ध करण्यासाठी काय केलं पाहा…
वाचा- कृपया हे घरी करू नका, हा World Record आहे! तरुणाचा VIDEO पाहून तुम्हीही हादराल या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की काही लोकांच्या मागे वाघ धावत आहे. दरम्यान, जीव वाचवण्यासाठी एका व्यक्तीनं चक्क खड्ड्यात उडी मारली. मात्र वाघानेही त्याच्याबरोबर खड्ड्यात उडी मारत या व्यक्तीवर हल्ला केला. सध्या या वाघाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.