प्राणीपालकांनी लाडक्या-खोडकर प्राण्यांचे चाळे प्रसिद्ध करण्यासाठी काय केलं पाहा...

प्राणी आपल्या नकळत काय करतात हे पाहणं खूप मजेशीर आहे..तुम्हीही हे पाहताना तुम्ही खूप हसाल...

प्राणी आपल्या नकळत काय करतात हे पाहणं खूप मजेशीर आहे..तुम्हीही हे पाहताना तुम्ही खूप हसाल...

  • Share this:
    नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : पेट शेमिंग (Pet shaming) हा एक लोकप्रिय इंटरनेट ट्रेंड आहे, यात पाळीव प्राण्याने केलेले चाळे मालकाच्या लक्षात येतात आणि ते रंगेहाथ पकडले जातात. प्राणीपालक हे चाळे करताना किंवा त्यानंतर लगेच आपल्या प्राण्याचा फोटो किंवा व्हिडीओ तयार करतात आणि तो इंटरनेटवर पोस्ट करतात. का? कारण हे चाळे आणि प्राणांची वर्तणूक गंमतशीर असते. त्याने हसून पुरेवाट होते. यामुळे आपले पाळीव प्राणी शांत, प्रेमळच नसून खोडकरही आहेत हे मालकांना कळतं आणि या व्हिडीओंच्या माध्यमातून मालकांमध्ये एक ऑनलाइन नेटवर्क तयार होतं. पेट शेमिंग करणारा समुदाय मोठा आहे. ‘पेट शॅमिंग’ नावाच्या फेसबुक ग्रुप अगदी योग्य अशी एक जागा आहे जिथे कुटुंब आपल्या त्रास देणाऱ्या पाळीव प्राण्यांचे चाळे जगातील इतर प्रत्येकासोबत शेअर करू शकतात. या ग्रुपमध्ये 1,02,000 हून अधिक सदस्य आहेत, या पोस्टचा आनंद पाळीव प्राणी मालक व इतर लोकही घेतात. "त्यांना चाळे करताना पकडा किंवा त्यांना हातवारे करून लाजवा.. आम्हाला आमचे फरी इडियट्स खूप आवडतात,"हे ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे. या ग्रुपमधून काही अतिशय हास्यदपद पेट-शेमिंग उदाहरणं इथं दिली आहेत. 1 ही मांजर जिला थोडी लाज वाटली पाहिजे जेणेकरून ती नीट वागेल “टेडची आपत्कालीन शस्त्रक्रिया झाली. टेडने पारंपरिक ई कॉलरने खाण्यासाठी नकार दिला म्हणून आम्ही एक पर्याय विकत घेतला. तर, तुम्हाला सादर करतो टेड इन ब्रेड. कृपया पारंपरिक ई कॉलर स्वीकारण्यास नकार दिल्याबद्दल टेडला लाजवा,” असे पोस्टमध्ये लिहिले आहे. 2 हा कुत्रा ज्याला अन्न काय आहे आणि त्याची विष्ठा काय, यातलं फरक कळत नाही. “माझे नाव बोर्बन आहे आणि मी माझी शी खातो,” ह्याने हे लाँग कॅप्शन सुरू होते. त्याच्या या घाणेरड्या सवयीबद्दल मला तेव्हा माहीत पडलं जेव्हा त्याचा आईला शीचा वास यायचा पण ती त्याला कोठेही दिसली नाही. मग एके दिवशी, बॉर्बनने बाथरूम केल्यानंतर आसपास काहीही खायला नसतानाही त्याला काहीतरी खाताना पाहिलं. यावेळी त्याच्या वडिलांनी तो असे काही करु शकत नाही असे सांगून त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. “मला लाजवा कारण मी नेहमीच या घाणेरड्या तोंडाने सर्वांना चुंबन देण्याचा प्रयत्न करत असतो,” हे पोस्टच्या शेवटी लिहिले होते. हे ही वाचा-कृपया हे घरी करू नका, हा World Record आहे! तरुणाचा VIDEO पाहून तुम्हीही हादराल 3 हा छोटा चोर ज्याला धड लपता ही येत नाही हा जॉर्ज, 19 आठवड्यांचं ग्रेट डेनचं पिल्लू. त्याचा गुन्हा? तो बेड चोर आहे. तो आपल्या लहान भावाच्या पलंगावर जाऊन झोपतो आणि त्याची मानवी आईला काळजीत पडते, कारण ती आजूबाजूला त्याला पाहत असते, तो तिला सापडत नाही. 4 या महान गोंधळाचा हा अभिमानी निर्माता इतर कुत्री चूक मान्य करत नाहीत किंवा गप्प बसतात, परंतु या कुत्र्याला त्याने केलेल्या कृत्याचा अभिमान आहे. तो हे कृत्य करताना घरी कुणी आल्याची कल्पना करा! या कुत्र्यानी केलेला प्रकार आवरणाऱ्या त्याचा मानवी आईला ते पसंत नसेल असं एकाने म्हटलंय. ही धाडसी गाय 5 जर आपल्याला वाटले की केवळ कुत्री आणि मांजरी हे खोडकर पाळीव प्राणी असू शकतात तर ते चुकीचं आहे. या प्रकरणात, भेटा या साहसी गायीला. कॅप्शननुसार तिचे नाव एम्बर आहे आणि ती गुरांच्या चाऱ्याच्या साठवणुकीच्या रेलिंगच्या आत शिरली आहे. प्रश्न हा आहे की तिनी हे धाडक केलं कसं?
    Published by:Meenal Gangurde
    First published: