एका पुरुषासाठी चार महिलांची फाईट. (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 21 जुलै : महिला असो वा पुरुष कुणालाही आपल्या जोडीदाराचे संबंध दुसऱ्या कुणासोबत असलेले सहनच होणार नाही. तरी काही लोक विवाहबाह्य संबंध ठेवतात. पण कधी ना कधी ते समोर येतं आणि पितळ उघडं पडतं. अशीच एक व्यक्ती जिचे विवाहबाह्य संबंध होते. त्याच्यासाठी एक-दोन नव्हे तर चार बायका आपसात भिडल्या आहेत. हा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. महिलांची फायटिंग तशी काही नवी नाही. नळ, लोकल ट्रेन, बस, दुकानं अशा काही ठिकाणी तुम्ही महिलांची हाणामारी पाहिलीच असेल. काही वेळा तर एका पुरुषासाठी भिडणाऱ्या दोन महिलांनाही तुम्ही पाहिलं असेल. पण आता एका पुरुषासाठी तब्बल चार महिला भांडताना दिसल्या. यूएसच्या लास वेगासमधील एका हॉटेलमध्ये चार महिलांची तुफान फायटिंग झाली. 9 जुलै रोजीची ही घटना आहे.
डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, विन हॉटेलमध्ये चार महिलांची हाणामारी झाली. यातील एक व्यक्तीची पत्नी, दुसरी गर्लफ्रेंड आणि इतर दोघी दोघींच्या मैत्रिणी होत्या. पत्नीला पतीच्या अफेअरबाबत माहिती झाली. त्याची गर्लफ्रेंड विन हॉटेलच्या कॅसिनोमध्ये असल्याचं तिला समजलं. तिथं पोकर स्पर्धा सुरू होती. लग्नात झाला गडबड घोटाळा! एक चूक आणि नवरदेवाच्या वडिलांसोबत नवरीचं लग्न पत्नी आपल्या एका मैत्रिणीला घेऊन हॉटेलमध्ये पोहोचली. तिने नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला बाथरूमजवळचं घेरलं आणि वाद घालू लागली. काही वेळाने तिने तिला बुक्के मारले. दोघींमध्ये हाणामारी सुरू झाली. दोघीही एकमेकींच्या झिंझ्या उपटू लागल्या. हाणामारीत त्यांचे कपडे फाटले, याचंही भान त्यांना राहिलं नाही. अखेर कसंबसं करून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या महिलांना सावरलं. त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, त्यांचे कपडे नीट केले. Viral News: एका झुरळाने उद्धवस्त केलं महिलेचं आयुष्य; घर, नोकरी सगळंच सोडावं लागलं, असं काय घडलं? ज्यावेळी महिलांची फायटिंग झाली, त्यावेळी तिथं असलेल्या सिल्व्हियो क्रिसारी नावाच्या व्यक्तीने हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि हा व्हिडीओ @silviocrisari ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला.
वाद झाला तेव्हा पती शहरात नव्हता. व्यक्तीची गर्लफ्रेंड आणि तिच्या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडलं. तर पत्नी आणि तिची मैत्रीण पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.