कॅनबेरा, 20 जुलै : लग्न म्हटलं की गडबड, गोंधळ आलाच. भारतातील लग्न तर गोंधळाशिवाय पूर्ण होतच नाहीत. कधी नातेवाइकांना राग येतो, कधी वधू-वर पक्षात भांडणं होतात. पण लग्नाचा असा गोंधळ फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही पाहायला मिळतो. असंच एक प्रकरण चर्चेत आलं आहे. ज्यात लग्नात अशी गडबड झाली की नवरदेवाच्या वडिलांशी नवरीचं लग्न झालं. म्हणजे नवरीबाई सासऱ्याची सूनबाई होण्याऐवजी सासऱ्याची पत्नी बनली. ऑस्ट्रेलियातील हे प्रकरण आहे. ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय ब्रेकफास्ट रेडिओ शो ‘फिट्झी अँड विप्पा विथ केट रिची’च्या होस्टला एका महिलेचा कॉल आला. किम असं तिचं नाव. शोमध्ये तिने तिच्या लग्नाचे विचित्र किस्से सांगितलं. तिच्या लग्नाची स्टोरी ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि हसायलाही भाग पाडलं. घो मला असला हवा! हिला नवरा शोधून द्या आणि 4 लाख रुपये मिळवा महिलेने सांगितलं की, तिनं आणि तिच्या पतीने कोर्ट मॅरेज करण्याचा विचार केला होता. त्यांना दोन साक्षीदारांची गरज होती. अशा परिस्थितीत तिची आई आणि मुलाचे वडील साक्षीदार म्हणून आले होते. आधी मुलाची आई येणार होती, पण नंतर तिने पतीला साक्षीदार होण्यास सांगितलं. जेव्हा ते लोक न्यायालयात गेले तेव्हा त्या सर्वांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. पण तिथंच एक चूक झाली. नवरदेवाने त्याला जिथं सही करायची होती तिथं केली. त्यानंतर साक्षीदारांनी सह्या करायच्या होत्या. त्यासाठी त्याचे वडील सही करायला गेले. पण त्यांनी साक्षीदाराच्या जागेऐवजी नवरदेवाच्या सहीजवळ सही केली. म्हणजेच किमने दोन पुरुषांशी लग्न केला. ज्यापैकी एक तिचा सासरा होता. लग्नाला यायचं हं, पण…; नवरीबाईची अजब अट, पाहुण्यांना जबर धक्का इंडिया टाइम्स वेबसाइटच्या वृत्तानुसार, रोडिओ शोचे होस्ट देखील किमची कहाणी ऐकून आश्चर्यचकित झाले. मात्र यानंतर किमने सर्व काही स्पष्ट केलं. कायदेशीर कागदपत्रांवर नव्हे तर सासरच्यांनीच मॅरेज सर्टिफिकेटवर सही केली असल्याचं ती म्हणाली. म्हणजे मॅरेज सर्टिफिकेटवर सासराही सुनेचा नवरा आहे. पण लग्नाशी संबंधित कायदेशीर कागदपत्रांवर सासरच्यांची सही नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.