नवी दिल्ली 21 जुलै : झुरळ एखाद्याचे आयुष्य उद्धवस्त करू शकतं का? आता तुम्ही म्हणाल हा कसला प्रश्न आहे. एक झुरळ कोणाचं आयुष्य उद्धवस्त कसं करेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण असं एक प्रकरण आता समोर आलं आहे. यात एक महिला अतिशय चांगलं आयुष्य जगत होती. चांगल्या पगाराची नोकरी करत होती. पण एका छोट्या झुरळाने सर्वकाही उद्ध्वस्त केलं. झुरळामुळे ती महिला इतकी वैतागली की तिने फक्त आपलं घरच सोडलं नाही तर नोकरीचाही राजीनामा दिला. जेव्हा महिलेनं सोशल मीडियावर लोकांसमोर तिची व्यथा सांगितली तेव्हा काही लोक हसले तर अनेकांना तिची वेदना समजली. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार ही विचित्र घटना चीनमधील आहे. मंगोलियाची ही महिला गुआंगझोऊ येथील एका कंपनीत तीन वर्षांपासून काम करत होती. यानंतर, अधिक पगार दुसरीकडे मिळत असल्याने महिलेने कंपनी बदलली आणि चीनच्या दक्षिण भागात शिफ्ट झाली. पण तिथे तिला वाईट अनुभवांना सामोरे जावं लागेल याची तिला कल्पना नव्हती. त्यामुळे तिला घर आणि नोकरी दोन्ही गमवावं लागणार आहे. या महिलेनं चिनी नेटवर्किंग साइट जियाहोंग्शुवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात म्हटलं आहे की, गुआंगडॉन्ग प्रांताच्या राजधानीत जाण्यापूर्वी तिने झुरळ पाहिले नव्हते. मात्र तिथे तिने मोठमोठी झुरळं पाहिली, जी उडूही शकत होती. हे पाहून महिला हैराण झाली. महिलेने झुरळांचे फोटो शेअर केले आणि झुरळांनी तिचा कसा छळ केला हे सांगितलं. तिला झुरळांची इतकी भीती वाटत होती की तिने घर तर सोडलंच. पण आता ती या भागात काम करण्यासही टाळाटाळ करत आहे. घरातील भेगा भरूनही फायदा झाला नाही, असं महिलेचं म्हणणं आहे. कारण तिच्या घरात झुरळांची फौज होती. Viral Video: समोरासमोर येताच आपसात भिडले मगर आणि विशालकाय अजगर; शेवटी कोण जिंकलं? आता या महिलेला झुरळ या शब्दाचीही भीती वाटू लागली आहे. तिच्यावर तिने असा दावा केली, की ती झुरळाची इमोजी पाहून घाबरते. तिला कॉकरोच फोबिया झाला आहे. महिलेनं सांगितलं की तिला खूप असहाय्य वाटू लागलं होतं. ती एकटीच रडायची. तिच्या मते, ती कोणत्याही समस्येवर मात करू शकते, परंतु तिच्या आत असलेली झुरळांची भीती नाहीशी होऊ शकत नाही. उडत्या झुरळांचा या महिलेला इतका त्रास झाला की, कंटाळून तिने नोकरीचा राजीनामा दिला. ती महिला म्हणाली, ‘आता मला या भागात राहायचं नाही. कारण, मी ऐकले आहे की घरात एक झुरळ दिसलं म्हणजे खोलीत झुरळांची संपूर्ण फौज असते.’’ महिलेची ही विचित्र कहाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.