नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : कोणत्याही वेबसाईटला भेट देण्यासाठी आता युजर्सला लॅपटॉप किंवा कम्प्यूटरची गरज नाही. कारण आता चांगले फीचर्स असलेल्या स्मार्टफोनचा वापर वाढल्याने कोणतीही वेबसाईट ही स्मार्टफोनवर ओपन करता येते. त्याच गोष्टीचा (website safety check on google) फायदा हॅकर्सकडून घेतला जातो. युजर्सने काही फेक वेबसाईट्स ओपन केल्या, तर त्याद्वारे हॅकर्स युजर्सच्या स्मार्टफोनमधील डेटा आणि प्रायव्हेट माहिती (how to avoid fake websites) गोळा करण्याची शक्यता असते. एवढंच नाही तर त्यामुळे स्मार्टफोनमध्ये व्हायरस आणि मालवेयर येण्याचा धोकादेखील असतो. त्यामुळे युजर्सने मोठी खबरदारी बाळगणं (how to check if a website is safe or not) गरजेचं आहे. स्मार्टफोनवर वेबसाईट्स ओपन करताना त्या फेक आहेत की नाही, त्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी या काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचा फोन हॅकर्सपासून, धोकादायक मालवेअरपासून सुरक्षित ठेवता येईल.
वेबसाईट्सचं https चेक करा - कोणतीही वेबसाईट ओपन केल्यानंतर त्याचा अड्रेस चेक करायला हवा. त्यात जर https:// असेल तर ती वेबसाईट सेफ असते. जर ते नसेल तर वेबसाईट (how to check website details) फेक असण्याची शक्यता असते. त्यामुळे https:// असलेल्या वेबसाईट्सलाच भेट द्यायला हवी. पॉप-अप चेक करा - हॅकर्स हे युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये पॉप-अपच्या माध्यमातून हॅकिंग करत असतात. त्यामुळे वेबसाईट ओपन करताना त्यातला पॉप-अप चेक करायला हवा. पॉप-अपद्वारे युजर्सला दुसऱ्या वेबसाईटवर नेलं जातं. त्यामुळे डेटाचोरीचा धोका निर्माण होत असतो.
Permission Request वर लक्ष द्या - काही फेक वेबसाईट्स ओपन करताना त्यातून युजर्सला काही Permission Request मागितल्या जातात. त्या Permissions लक्षपूर्वक वाचायला हव्या. कारण त्याद्वारे काही असुरक्षित लिंक्स हॅकर्स युजर्सच्या डिव्हाईसमध्ये टाकतात आणि त्याद्वारे हेरगिरी केली जाते. URL चेक करा - कोणत्याही शॉपिंग वेबसाईट्स , बँकिंग वेबसाईट्स किंवा इन्फर्मेटिव वेबसाईट्सचा वापर करत असताना त्यावरील URL काळजीपूर्वक चेक करायला हवा. कारण त्याद्वारे स्मार्टफोन फिशिंग होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर युआरएलमधील स्पेलिंग आणि स्पेस नीट चेक करून घ्यायला हवा.
सर्च इंजिंनचा वापर करा - वेबसाईट्स ओपन करताना त्याला ब्राउजर किंवा इतर प्लॅटफॉर्मवरून ओपन करताना त्याच्या सर्च इंजिनचा वापर करायला हवा. कारण थेट वेबसाईट ओपन केल्यामुळे, त्याद्वारे फेक वेबसाईट्स ओपन होण्याची शक्यता असते. वेबसाईट्स ओपन करताना सर्च इंजिनचा वापर केल्यास ते अधिक सेफ ठरतं. वेबसाईट्सवरील कन्टेंट पाहा - वेबसाईट्सवर भेट दिल्यानंतर त्यावर खराब क्वॉलिटीसह कमी कन्टेंट असण्याचीही शक्यता असते. अनेकदा त्यात स्पेलिंगच्या चुका असताच. अशा वेबसाईट्स फेक असतात. त्यामुळे युजर्सने स्मार्टफोनवर कोणतीही वेबसाईट ओपन केल्यानंतर त्यावरील कन्टेंट नीट वाचायला हवा.
Virus Total चा वापर करा - Virus Total ही एक प्रसिद्ध वेबसाईट आहे. ज्याद्वारे युजर्सला URL चेक करता येतो. त्याचबरोबर Virus Total मध्ये फेक आणि खऱ्या वेबसाईट्सचीही माहिती मिळवता येते.