मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सावधान ! Google Play Store वर Joker Malware ची पुन्हा एन्ट्री, ताबडतोब डिलीट करा 'हे' 15 ॲप्स

सावधान ! Google Play Store वर Joker Malware ची पुन्हा एन्ट्री, ताबडतोब डिलीट करा 'हे' 15 ॲप्स

जोकर मालवेअरमुळे (Joker malware) प्रभावित झालेल्या ॲप्सपैकी बरीच ॲप्स बऱ्यापैकी लोकप्रिय आहेत. काही ॲप्स तर 50 हजारांपेक्षा जास्त फोनवर इन्स्टॉल्ड (Installed) आहेत.

जोकर मालवेअरमुळे (Joker malware) प्रभावित झालेल्या ॲप्सपैकी बरीच ॲप्स बऱ्यापैकी लोकप्रिय आहेत. काही ॲप्स तर 50 हजारांपेक्षा जास्त फोनवर इन्स्टॉल्ड (Installed) आहेत.

जोकर मालवेअरमुळे (Joker malware) प्रभावित झालेल्या ॲप्सपैकी बरीच ॲप्स बऱ्यापैकी लोकप्रिय आहेत. काही ॲप्स तर 50 हजारांपेक्षा जास्त फोनवर इन्स्टॉल्ड (Installed) आहेत.

मुंबई, 22 नोव्हेंबर : गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) पुन्हा एकदा जोकर मालवेअर (Joker malware) या भयंकर व्हायरसचा शिरकाव झाला झाला आहे, असा इशारा कास्पेरस्की (Kaspersky) या सायबर सिक्युरीटी फर्ममधील तज्ज्ञ तात्याना शिश्कोव्हा (Tatyana Shishkova) यांनी सर्व अँड्रॉईड (Android) फोन वापरणाऱ्यांना दिला आहे. या संदर्भातलं एक ट्विट त्यांनी केलं आहे. या जोकर मालवेअरमुळे 15 अँड्रॉईड ॲप्सवर परिणाम झाला आहे. गेल्यावर्षीही जोकर मालवेअरमुळे काही सॉफ्टवेअर प्रभावित झाली होती. त्यामुळे त्याचा अर्थातच धसका आता लोकांनी घेतला आहे. युजर्सनं ही प्रभावित झालेली ॲप्स आपल्या फोनमधून काढून टाकावीत असं आवाहन गुगलनं केलं आहे. मात्र गुगल प्ले स्टोअरवर पुन्हा या मालवेअरचा शिरकाव झाल्याचंच दिसत आहे.

जोकर मालवेअरमुळे प्रभावित झालेल्या ॲप्सपैकी बरीच ॲप्स बऱ्यापैकी लोकप्रिय आहेत. काही ॲप्स तर 50 हजारांपेक्षा जास्त फोनवर इन्स्टॉल्ड आहेत. तर शिश्कोव्हा यांच्या यादीत काही ॲप्स अगदी नवीन आणि अगदीच कमी माहिती असलेलीही आहेत.

जोकर मालवेअर म्हणजे काय आणि त्यामुळे काय होतं?

जोकर मालवेअर गुगल प्ले स्टोअरवरील लोकप्रिय ॲप्सना प्रभावित करतं आणि जेव्हा ही ॲप्स युजर डाउनलोड करतात तेव्हा त्यांच्या फोनमध्ये शिरतं. गुगल प्ले स्टोअरमध्ये काही अगदी किरकोळ बदल करून आणि प्ले स्टोअरच्या सुरक्षेला बगल देऊन हे जोकर मालवेअर गुगल प्ले स्टोअरला प्रभावित करतं. हा व्हायरस पुन्हा पुन्हा येत असल्याचं दिसून आलं आहे. 2017 मध्ये जोकर मालवेअर पहिल्यांदा आढळलं होतं आणि या मालवेअरपासून आपल्या युजर्सच्या सुरक्षेसाठी गुगल सातत्यानं प्रयत्न करत आहे.

हेही वाचा : एअरटेलच्या ग्राहकांसाठी वाईट बातमी, प्रीपेड प्लॅन्सचे दर महागले, जाणून घ्या तुमच्या प्लॅनचा नवा दर

युजरच्या माहितीशिवाय जोकर मालवेअरमार्फत अगदी गुप्तपणे ऑनलाईन सर्व्हिसेस सबस्क्राईब करून त्यातून युजर्सचे पैसेही चोरले जातात. ऑटोमॅटिकली ऑनलाईन ॲड्स चालवण्याची ताकदही जोकर मालवेअरमध्ये आहे. तसंच SMS द्वारे OTP पर्यंत पोहोचून पेमेंटसाठी मान्यताही जोकर मालवेअरमार्फत देता येते. एखाद्या सर्व्हिसला आपण ऑनलाईन सबस्क्राईब केलं आहे का या बद्दल युजरला कळतही नाही इतक्या शिताफीनं हे सगळं होतं. बँक स्टेटमेंट बघितल्याशिवाय आपल्या खात्यातून पैसे कशासाठी गेले आहेत हेही अनेकदा युजर्सना कळत नाही.

हेही वाचा : मणक्याच्या आजाराने त्रस्त उद्धव ठाकरेंवर Spine Surgery; जाणून घ्या लेटेस्ट हेल्थ अपडेट

जोकर मालवेअरपासून सावधान राहण्यासाठी तुमच्या फोनमध्ये जर खालील 15 पैकी कोणती ॲप्स असतील तर ती ताबडतोब डिलिट करा-

1. ईझी पीडीएफ स्कॅनर (Easy PDF Scanner)

2. नाऊ क्यूआर कोड स्कॅनर (Now QRCode Scan)

3. सुपर क्लिक व्हीपीएन (Super-Click VPN)

4. व्हॉल्युम बूस्टर लाऊडर साऊंड इक्वेलायझर (Volume Booster Louder Sound Equalizer)

5. बॅटरी चार्जिंग ॲनिमेशन बबल इफेक्ट्स (Battery Charging Animation Bubble Effects)

6. स्मार्ट टीव्ही रिमॉ (Smart TV Remote)

7. व्हॉल्यूम बुस्टिंग हिअरिंग एड (Volume Boosting Hearing Aid)

8. फ्ल्शलाईट फ्लॅश अलर्ट ऑन कॉल (Flashlight Flash Alert on Call)

9. हॅलोविन कलरिंग ( Halloween Coloring)

10. क्लासिक इमोजी कीबोर्ड (Classic Emoji Keyboard)

11. सुपर हिरो इफेक्ट (Super Hero-Effect)

12. डॅझलिंग की-बोर्ड (Dazzling Keyboard)

13. इमोंजी वन की बोर्ड (Emoji One Keyboard)

14. बॉरी चार्जिंग ॲनिमेशन वॉलपेपर (Battery Charging Animation Wallpaper)

15. ब्लेंडर फोटो एडिटर इझी फोटो बॅकग्राऊंड एडिटर (Blender Photo Editor-Easy Photo Background Editor)

त्यामुळे तुमच्या फोनमध्ये काहीही डाऊनलोड करताना सावधान राहा.

First published: