मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

'ही' सात ॲप्स तुमच्या फोनसाठी ठरु शकतात घातक, गुगलनंही केली कारवाई

'ही' सात ॲप्स तुमच्या फोनसाठी ठरु शकतात घातक, गुगलनंही केली कारवाई

प्ले स्टोअरवरील 7 अँड्रॉइड ॲप्स (Android apps) 'जोकर' मालवेअरनं (Joker malware) प्रभावित झाल्याची माहिती समोर येत आहे. ही ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होती.

प्ले स्टोअरवरील 7 अँड्रॉइड ॲप्स (Android apps) 'जोकर' मालवेअरनं (Joker malware) प्रभावित झाल्याची माहिती समोर येत आहे. ही ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होती.

प्ले स्टोअरवरील 7 अँड्रॉइड ॲप्स (Android apps) 'जोकर' मालवेअरनं (Joker malware) प्रभावित झाल्याची माहिती समोर येत आहे. ही ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होती.

मुंबई, 22 नोव्हेंबर : अँड्रॉइड फोनच्या गुगल प्ले स्टोअरवर अनेकदा काही मालवेअर ॲप्स येतात. गुगलनं (Google) प्ले स्टोअर (Play Store) च्या सुरक्षेसाठी उपाययोजना केलेल्या असल्या तरी त्याठिकाणी असे काही ॲप्स शिल्लक आहेत, ज्यामुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये अडचणी उद्भवू शकतात. युजर्सच्या डिव्हाइसला इन्फेक्ट करू शकतील अशा ॲप्सपासून बचाव करण्यासाठी गुगल सातत्यानं प्रयत्नशील आहे. आता प्ले स्टोअरवरील 7 अँड्रॉइड ॲप्स (Android apps) 'जोकर' मालवेअरनं (Joker malware) प्रभावित झाल्याची माहिती समोर येत आहे. ही ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होती. मिळालेल्या माहितीनुसार, ही ॲप्स गुगलनं आपल्या स्टोअरवरून काढून टाकली आहेत. मात्र, ज्या युजर्सनी अगोदरच ही ॲप्स डाउनलोड करून इन्स्टॉल केली आहेत त्यांच्या फोनमध्ये ती अजूनही असण्याची शक्यता आहे. परिणामी, अशा युजर्सचे फोन धोक्यात आहेत. गुगलनं ब्लॅकलिस्ट केलेली ही सात ॲप्स कोणती आहेत, याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

सात ॲप्स आहेत फोनसाठी घातक

सिक्युरिटी फर्म कॅस्पर्सकीमधील (Kaspersky) तात्याना शिश्कोवा यांनी जोकर मालवेअरनं इन्फेक्ट झालेली सात ॲप्स शोधून काढली आहेत. ही ॲप्स गुगल प्ले स्टोअरवर लाइव्ह होती. लाखो युजर्स या ॲप्लिकेशन्सचा वापर करत आहेत. लोकप्रिय नेटफ्लिक्स शो स्क्विड गेमचा संदर्भ देणाऱ्या फाइलींमध्येही असेच मालवेअर होते. युजर्सनी रिपोर्ट केल्यानंतर गुगलनं ही अँड्रॉइड मालवेअर ॲप्स काढून टाकली आहेत.

हेही वाचा : सावधान ! Google Play Store वर Joker Malware ची पुन्हा एन्ट्री, ताबडतोब डिलीट करा 'हे' 15 ॲप्स

जोकर मालवेअर असलेली सात ॲप्स -

1. नाऊ क्यूआरकोड स्कॅन (Now QRcode Scan)

2. इमोजीवन कीबोर्ड (EmojiOne Keyboard)

3. बॅटरी चार्जिंग ॲनिमेशन्स बॅटरी वॉलपेपर (Battery Charging Animations Battery Wallpaper)

4. डॅझलिंग कीबोर्ड (Dazzling Keyboard)

5. व्हॉल्युम बूस्टर लाउडर साउंड इक्विलायझर (Volume Booster Louder Sound Equalizer)

6. सुपर हिरो इफेक्ट (Super Hero-Effect)

7. क्लासिक इमोजी कीबोर्ड (Classic Emoji Keyboard)

वरील सात ॲप्सपैकी एखादं ॲप तुमच्या फोनमध्ये असेल तर ते लगेच अनइन्स्टॉल करून टाका. कारण, गुगलनं देखील सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या स्टोअरमधून ते काढून टाकलं आहे.

हेही वाचा : एअरटेलच्या ग्राहकांसाठी वाईट बातमी, प्रीपेड प्लॅन्सचे दर महागले, जाणून घ्या तुमच्या प्लॅनचा नवा दर

ट्रोजन आणि सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अशी ॲप्लिकेशन बनावट सबस्क्रिप्शन आणि इन-ॲप ॲक्टव्हिटींचा वापर करून काळा पैसा कमवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे अननोन सोर्सकडून आलेल्या लिंक उघडण्यापूर्वी युजर्सनी काळजी घेतली पाहिजे. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. अधिकाधिक लोक विविध ऑनलाईन सुविधांचा वापर करत असल्यानं चोरी आणि फसवणुकीच्या अनेक नवीन पद्धती समोर आल्या आहेत.

आपलं दैनंदिन जीवन सुकर आणि रंजक करण्यासाठी विविध ॲप्सचा वापर करणं चांगली गोष्ट आहे. मात्र, त्यातून आपली फसवणूकही होऊ शकते, ही गोष्ट लक्षात ठेवून त्यांचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे.

First published: