झिम्बाब्वे, आयर्लंड सुपर 12 फेरीत
होबार्ट, 21 ऑक्टोबर: आयर्लंडपाठोपाठ झिम्बाब्वेनं करो या मरोच्या मुकाबल्यात बाजी मारली आणि टी20 वर्ल्ड कप च्या सुपर 12 फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे आता सुपर 12 फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. श्रीलंका, नेदरलँड्स, आयर्लंड आणि झिम्बाब्वे हे चार संघ सुपर 12 साठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी झिम्बाब्वे आणि नेदरलँड या दोन टीम्स भारताच्या ग्रुपमध्ये आहेत. सिकंदर रझाची अष्टपैलू खेळी आणि क्रेग एर्विनचं अर्धशतक याच्या जोरावर झिम्बाब्वेनं आज स्कॉटलंडचा 5 विकेट्सनी पराभव केला. स्कॉटलंडनं दिलेलं 133 धावांचं आव्हान झिम्बाब्वेनं 18.3 ओव्हर्समध्येच पूर्ण केलं आणि वर्ल्ड कपच्या सुपर 12 फेरीत दणक्यात एन्ट्री केली. सुपर 12 फेरीचं चित्र स्पष्ट सुपर 12 फेरीच्या ग्रुप 1 मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि अफगाणिस्तानसह पात्रता फेरीतून आलेल्या श्रीलंका आणि आयर्लंड संघांचा समावेश आहे. तर दुसरीकडे ग्रुप 2 मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेशसह पात्रता फेरीतील झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स हे संघ आहेत
टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे सामने 23 ऑक्टोबर 2022 भारत वि. पाकिस्तान, सुपर 12 मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, दुपारी 1.30 वा. 27 ऑक्टोबर 2022 भारत वि. नेदरलँड्स, सुपर 12 सिडनी क्रिकेट ग्राऊंड, दुपारी 12.30 वा. 30 ऑक्टोबर 2022 भारत वि. दक्षिण आफ्रिका, सुपर 12 पर्थ स्टेडियम, दुपारी 4.30 वा. 02 नोव्हेंबर 2022 भारत वि. बांगलादेश, सुपर 12 अॅडलेड ओव्हल, दुपारी 1.30 वा., 06 नोव्हेंबर 2022 भारत वि. झिम्बाब्वे, सुपर 12 मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, दुपारी 1.30 वा. हेही वाचा - T20 World Cup: वेस्ट इंडिजवर आली बॅग भरण्याची वेळ… टी20 वर्ल्ड कप इतिहासात ‘हे’ पहिल्यांदाच घडलं! वेस्ट इंडिजची एक्झिट दरम्यान टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात वेस्ट इंडिज संघ पहिल्यांदाच सुपर फोर फेरीआधीच गादर झाला. टी20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज हा एकमेव संघ आहे ज्याने ही स्पर्धा दोन वेळा जिंकली आहे. 2012 आणि 2016 साली विंडीज संघानं डॅरेन सॅमीच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकला होता. पण त्यानंतर गेल्या वर्ल्ड कपमध्ये दिग्गजांचा भरणा असूनही विंडीजला बाद फेरी गाठता आली नाही. आणि यंदा तर स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच क्वालिफाईंग राऊंडमधूनच हा संघ स्पर्धेबाहेर पडला. क्वालिफाईंग फेरीच्या ब गटात आयर्लंडनं आज वेस्ट इंडिजला जोरदार धक्का देताना कॅरेबियन संघाचा 9 विकेट्सनी धुव्वा उडवला आणि सुपर 12 फेरी गाठली.