JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ind vs NZ ODI: हा जिथे जातो तिथे सुरु होतो... टीम इंडियाच्या 'या' खेळाडूनं पाहा मॅचआधी काय केलं? Video

Ind vs NZ ODI: हा जिथे जातो तिथे सुरु होतो... टीम इंडियाच्या 'या' खेळाडूनं पाहा मॅचआधी काय केलं? Video

Ind vs NZ ODI: मॅचआधी आशिष नेहरा, गौरव कपूर आणि मोहम्मद कैफची चर्चा सुरु होती. त्यावेळी चहल लपूनछपून आशिष नेहराच्या मागे उभा राहिला. याची नेहरालाही कल्पना नव्हती.

जाहिरात

युजवेंद्र चहलची 'फिरकी'

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ख्राईस्टचर्च, 29 नोव्हेंबर: ख्राईस्टचर्चच्या शेवटच्या वन डेत टीम इंडियाची सुरुवातीला दाणादाण उडाली खरी पण त्याआधी एका खेळाडूनं मात्र चाहत्यांचं चांगलंच मनोरंजन केलं. युजवेंद्र चहल टीम इंडियाच्या दिलखुलास खेळाडूंपैकी एक आहे. चहल सोशल मीडियातही चांगलाच अॅक्टिव्ह असतो. मैदानात खेळाडूंशी आणि इतरांशीही त्याची चांगलीच थट्टामस्करी चालते. आजही ख्राईस्टचर्चच्या मैदानात मॅच सुरु होण्याआधी चहलनं तेच केलं. चहलच्या या कारनाम्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. आणि आज चहलच्या रडारवर होता आशिष नेहरा. चहलकडून नेहराची फिरकी मॅचआधी आशिष नेहरा, गौरव कपूर आणि मोहम्मद कैफची चर्चा सुरु होती. त्यावेळी चहल लपूनछपून आशिष नेहराच्या मागे उभा राहिला. याची नेहरालाही कल्पना नव्हती. त्याचवेळी हे तिघेही भारताच्या प्लेईंग इलेव्हनबद्दल चर्चा करत होते. पण जेव्हा नेहराच्या लक्षात आलं की चहल त्याच्या मागे उभा आहे तेव्हा त्यानं गमीतीनं त्याला ऑल राऊंडर म्हटलं आणि विचारलं की आज तो टीम इंडियासाठी ओपनिंग करणार का?

संबंधित बातम्या

हेही वाचा -  Roger Binny: सूनेमुळे अडचणीत आले बीसीसीआय अध्यक्ष, ‘या’ कारणामुळे रॉजर बिन्नींना नोटीस; पाहा काय आहे प्रकरण? टीम इंडियाची दाणादाण दरम्यान ख्राईस्टचर्चमध्ये टीम इंडियाची चांगलीच दाणादाण उडाली. किवी आक्रमणासमोर निम्मा भारतीय संघ 121 धावात माघारी परतला होता. आघाडीच्या फलंदाजांपैकी श्रेयस अय्यरनं 49 धावांची खेळी केली. पण धवन (28) गिल (13), सूर्यकुमार (6) हे खेळाडू लवकर माघारी परतले.  दरम्यान या मालिकेत न्यूझीलंड पहिली वन डे जिंकून आघाडीवर आहे. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधायची असेल तर भारताला ही वन डे जिंकावी लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या