जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Roger Binny: सूनेमुळे अडचणीत आले बीसीसीआय अध्यक्ष, 'या' कारणामुळे रॉजर बिन्नींना नोटीस; पाहा काय आहे प्रकरण?

Roger Binny: सूनेमुळे अडचणीत आले बीसीसीआय अध्यक्ष, 'या' कारणामुळे रॉजर बिन्नींना नोटीस; पाहा काय आहे प्रकरण?

मयंती लँगरमुळे रॉजर बिन्नी अडचणीत?

मयंती लँगरमुळे रॉजर बिन्नी अडचणीत?

Roger Binny: रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. पण बिन्नी यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळून महिना झाला तोच बीसीसीआयचे एथिक्स ऑफिसर विनित सरन यांच्या बोर्डानं रॉजर बिन्नी यांना एक नोटीस पाठवली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 नोव्हेंबर: गेल्या महिन्यात सौरव गांगुलीनंतर भारताचे माजी कसोटीवीर आणि 1983 च्या वन डे विश्वविजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. पण बिन्नी यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळून महिना झाला तोच बीसीसीआयचे एथिक्स ऑफिसर विनित सरन यांच्या बोर्डानं रॉजर बिन्नी यांना एक नोटीस पाठवली आहे. हितसंबंधांच्या मुद्द्यावरुन ही नोटीस पाठवण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार बिन्नी यांना मिळालेल्या नोटीसमध्ये म्हटलंय की… ‘बीसीसीआयच्या नियम 39 (2) बी नुसार एथिक्स ऑफिसरना बीसीसीआयचे नियम 38 (1) आणि नियम 38 (2) चं उल्लंघन केल्याची तक्रार मिळाली आहे. ज्यानुसार हितसंबंधांच्या मुद्द्याचं हे कारण ठरत आहे.’ यामागचं कारण हे आहे की रॉजर बिन्नी यांची सून मयंती लँगर ही स्टार स्पोर्टसाठी काम करते. स्टार स्पोर्टसकडे बीसीसीआयच्या डोमेस्टिक सामन्यांचे सगळे अधिकार आहेत. याच कारणामुळे आता रॉजर बिन्नी अडचणीत आले आहेत. मयंती ही रॉजर बिन्नींचा लेक आणि टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीची पत्नी आहे. हेही वाचा -  Cricket: नशीब म्हणतात ते याला… डायरेक्ट हिट, बॅट्समन क्रीझबाहेर तरीही अम्पायरनं दिलं नॉट आऊट; पाहा Video 20 डिसेंबरपर्यंत द्यावं लागणार उत्तर दरम्यान 20 डिसेंबरपर्यंत रॉजर बिन्नी यांना लिखित स्वरुपात याबाबत उत्तर द्यावं लागणार आहे. हेही वाचा -  Rohit Sharma: पापा की लाडली! रोहित शर्मानं एक दिवस आधीच साजरा केला मुलीचा बर्थडे, हे आहे कारण… 17 ऑक्टोबरला मिळालं अध्यक्षपद रॉजर बिन्नी गेल्या महिन्यात 17 ऑक्टोबरला बीसीसीआयचे अध्यक्ष बनले होते. भारतीय क्रिकेटमध्ये बिन्नी यांचं मोठं योगदान आहे. रॉजर बिन्नी 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचेही सदस्य होते. 67 वर्षांच्या बिन्नी यांनी आपल्या कारकीर्दीत 27 कसोटी आणि 20 वन डे सामने खेळले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI , cricket , sports
  • First Published :
जाहिरात
जाहिरात