JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Team India: भर मैदानात टीम इंडियाच्या खेळाडूंनी उमरान मलिकला का मारलं? Video Viral

Team India: भर मैदानात टीम इंडियाच्या खेळाडूंनी उमरान मलिकला का मारलं? Video Viral

Team India: टीम इंडियाचे खेळाडू नेपियरच्या मैदानात सराव करत असतानाच वेगवान गोलंदाज उमरान मलिकची काही जणांनी धुलाई केली. टेलिव्हिजन कॅमेऱ्यातही ही दृश्य टिपण्यात आली आणि प्रश्न पडला की उमरान मलिकसोबत हे काय चाललंय?

जाहिरात

उमरान मलिक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नेपियर, 22 नोव्हेंबर: भारतानं न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका अखेर 1-0 अशा फरकानं खिशात घातली. पावसानं व्यत्यय आणलेल्या या संपूर्ण मालिकेत वेलिंग्टनमधला विजय निर्णायक ठरला. तर नेपियरच्या तिसऱ्या टी20 सामन्यात डकवर्थ लुईसनुसार सामना टाय झाला हेही टीम इंडियाच्या पथ्थ्यावर पडलं. त्यामुळे हार्दिक पंड्यानं विराट कोहलीनंतर न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा भारताला टी20 मालिकाविजय मिळवून दिला. पण या सामन्यादरम्यान एक मजेशीर घटना घडली. टीम इंडियाचे खेळाडू नेपियरच्या मैदानात सराव करत असतानाच वेगवान गोलंदाज उमरान मलिकची काही जणांनी धुलाई केली. टेलिव्हिजन कॅमेऱ्यातही ही दृश्य टिपण्यात आली आणि प्रश्न पडला की उमरान मलिकसोबत हे काय चाललंय? उमरानची धुलाई कॅमेऱ्यात कैद उमरान मलिकला टी20 मालिकेत एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. आजही उमरान मलिक राखीव खेळाडूंमध्ये होता. पावसामुळे नेपियर टी20 उशीरानं सुरु झाली. यावेळी भारतीय खेळाडू मैदानात सराव करत असताना रिषभ पंतसह काही खेळाडूंनी उमरानला घेरलं आणि त्याला एकप्रकारे मारण्यास सुरुवात केली. हा सगळा प्रकार काय होता हे कुणाच्याही लक्षात आलं नाही. पण त्यानंतर अशी माहिती मिळाली की आज उमरान मलिकचा वाढदिवस होता. आणि म्हणूनच हे सगळे खेळाडू मिळून त्याला बर्थडे बम्स देत होते.

हेही वाचा -  Aus vs Eng: ‘या’ खेळाडूचा क्लासच वेगळा, आऊट झाल्यानंतर केलं असं की स्टेडियममधले सगळेच झाले फॅन! VIDEO नेट बॉलर ते टीम इंडिया उमरानचा प्रवास आज उमरान मलिक 23 वर्षांचा झाला. तो मूळचा काश्मीरच्या श्रीनगरचा. पण टीम इंडियापर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. आज भारतीय क्रिकेटमध्ये उमरानची स्पीड स्टार अशी ओळख आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला आहे. उमरानचे वडील रशीद मलिक एक फळविक्रेता आहेत. त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची खूप आवड होती. उमरानची हीच आवड जोपासण्यासाठी वडील त्याला जम्मूला घेऊन आले. आर्थिक परिस्थितीमुळे त्याला दहावीनंतर शिक्षण सोडावं लागलं. पण उमराननं क्रिकेटमध्ये प्रचंड मेहनत घेतली आणि आज तो भारतातला एक यशस्वी गोलंदाज बनला आहे.

2020 साली डोेमेस्टिक क्रिकेटमधल्या कामगिरीमुळे त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली. त्याआधी त्यानं नेट बॉलर म्हणूनही काम केलं होतं. या संधीचं त्यानं सोनं केलं. सनरायझर्स हैदराबादकडून त्यानं चांगला परफॉर्मन्स दिला. 150 पेक्षा जास्त वेगानं गोलंदाजी हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच भारतीय क्रिकेटमध्ये त्याला स्पीड गन अशी नवी ओळख मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या