भारत वि न्यूझीलंड दुसऱ्या वन डेत पाऊस?
हॅमिल्टन, 26 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड संघात तीन वन डे सामन्यांची मालिका संध्या सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना 7 विकेट्सनी जिंकून न्यूझीलंडनं आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा सामना शिखर धवनच्या भारतीय संघासाठी निर्णायक ठरणार आहे. दरम्यान पहिल्या सामन्यात तब्बल 600 पेक्षा जास्त धावांचा पाऊस दोन्ही संघांनी पाडला. पण हॅमिल्टनमध्ये मात्र खरा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कसा असेल हवामानाचा मूड? भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता उभय संघातला दुसरा टी20 सामना होणार आहे. पण या सामन्यादरम्यान हॅमिल्टनमध्ये पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. दुपारनंतर जवळपास चार तास पाऊस सुरु राहील असा अंदाज आहे. यावेळी आकाशात काळे ढग आणि हवाही जोरात वाहणार असल्याचं स्थानिक हवामान खात्यानं म्हटलं आहे.
हॅमिल्टनमध्ये कसं आहे भारताचं रेकॉर्ड? ऑकलंडप्रमाणेच हॅमिल्टनमध्येही भारताचं रेकॉर्ड तितकंसं चांगलं नाही. भारतानं या मैदानात आतापर्यंत आठपैकी केवळ एकच मॅच जिंकली आहे. 2009 साली धोनीच्या नेतृत्वात इथं टीम इंडियानं शेवटचा सामना जिंकला होता. त्यावेळी वीरेंद्र सेहवागनं 125 धावांची खेळी केली होती. पण त्यानंतर गेल्या 13 वर्षात इथे एकही मॅच जिंकलेली नाही. हेही वाचा - Cricket: अरे हे काय घडलं? पाकिस्तानी बॉलरनं आपल्याच सहकाऱ्याचं फोडलं डोकं, Video भारत वि. न्यूझीलंड, दुसरी वन डे सेडॉन पार्क, हॅमिल्टन भारतीय वेळेनुसार सकाळी 7.00 वाजता अॅमेझॉन प्राईमवर थेट प्रक्षेपण