लाहोर, 26 नोव्हेंबर: पाकिस्तान संघ येत्या 1 डिसेंबरपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. रावळपिंडीत उभय संघातली पहिली कसोटी होणार आहे. त्यासाठीच सध्या लाहोरमध्ये पाकिस्तानी संघाचा सराव सुरु आहे. याच सरावादरम्यान आज पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफनं मात्र आपल्या संघाला चिंतेत टाकलं आहे. नेट्समध्ये प्रॅक्टिस करत असताना हॅरिस रौफच्या बाऊन्सरवर पाकिस्तानचा आघाडीचा फलंदाज अझर अली जखमी झाल्याची घटना घडली.
हॅरिसचा बाऊन्सर थेट हेल्मेटवर
कोच सकलेन मुश्ताक यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानचा संघ लाहोरमध्ये सध्या चांगलाच घाम गाळतोय. आज दुपारच्या सत्रात सरावावेळी अझर अली हॅरिसच्या बॉलिंगवर बॅटिंग प्रॅक्टिस करत होता. त्यावेळी रौफच्या एका वेगानं येणाऱ्या बाऊन्सरनं थेट अझर अलीच्या हल्मेटचा वेध घेतला. यावेळी अझर नेट्समधून लगेचच बाहेर पडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Azhar Ali struck on the helmet by Haris Rauf pic.twitter.com/mb7DfvLbjB
— Thakur (@hassam_sajjad) November 26, 2022
हेही वाचा - Gujrat Election: दुखापतीमुळे बांगलादेश दौऱ्यातून माघार, पण टीम इंडियाचा हा क्रिकेटर बायकोसाठी करतोय 'हे' काम
पाकिस्तान-इंग्लंड कसोटी मालिका
2005 नंतर इंग्लंडचा संघ पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये कसोटी खेळणार आहे. याआधी नुकत्याच झालेल्या टी20 वर्ल्ड कपआधी इंग्लंडनं 17 वर्षांनी पाकिस्तानचा दौरा केला होता. 7 सामन्यांची टी20 मालिका खेळून दोन्ही संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाले होते. ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप जिंकून इंग्लंड यूएईत पोहोचली आहे. पाकिस्तानला निघण्यापूर्वी इंग्लंडनं अबुधाबीत तीन दिवसांचा सराव सामना खेळला. पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडचा संघ तीन कसोटी खेळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sports