विराट कोहली
मुंबई, 17 ऑगस्ट**:** 27 ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीत आशिया चषकाचं बिगुल वाजणार आहे. या स्पर्धेसाठी भारतासह सहा संघ एकमेकांशी भिडणार आहेत. त्यासाठी खेळाडूंची जोरदार तयारी सुरु आहे. याच दरम्यान विराटनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत विराट जिममध्ये घाम गाळताना दिसतोय. सोशल मीडियात वर्कआऊट करतानाचा हा व्हिडीओ विराटनच पोस्ट केला आहे.
आशिया चषकात विराट मॅजिक**?** टीम इंडियाच्या या माजी कर्णधारानं इंग्लंड दौऱ्यानंतर विश्रांती घेतली होती. पण आशिया चषकाच्या तयारीसाठी विराटनं चांगलीच कंबर कसली आहे. मुंबईतल्या बीकेसीतील शरद पवार क्रिकेट अकादमीत विराट संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली फलंदाजीचा सराव करतोय. याच दरम्यान विराट फिटनेसवरही जोर देतोय. गेल्या काही वर्षात विराटच्या बॅटमधून धावांचा ओघ कमी झालाय. प्रत्येक मालिकेत विराटची त्याच्या फॉर्मशी झुंज सुरु आहे. इंग्लंड दौऱ्यातही विराटला आपल्या फलंदाजीतली जादू दाखवता आली नाही. पण आगामी आशिया चषकात तो पुन्हा फॉर्मात येईल अशी अपेक्षा क्रिकेटरसिक करतायत. कारण आशिया चषकात विराटनं आतापर्यंत दमदार कामगिरी बजावली आहे. विराटची आशिया चषकातील आकडेवारी सामने – 16 धावा – 766 शतकं – 3 अर्धशतकं – 2 सरासरी – 63.83 हेही वाचा - Vinod Kambli: नोकरी देता का नोकरी? टीम इंडियाच्या माजी कसोटीवीराची नोकरीसाठी साद भारताची सलामी पाकिस्तानशी आशिया चषकासाठी भारतीय संघ पुढच्या आठवड्यात दुबईला प्रयाण करेल. आशिया चषकात टीम इंडियाचा सलामीचा सामना होणार तो पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी. 28 ऑगस्टच्य़ा संध्याकाळी दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पाकिस्तानविरुद्ध महत्वाची बाब म्हणजे विराटनं आपल्या वन डे कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी ही पाकिस्तानविरुद्धच केली आहे. 2012 सालच्या आशिया चषकाच्याच सामन्यात विराटनं पाकिस्तानच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली होती. त्या सामन्यात विराटच्या बॅटमधून तब्बल 183 धावा निघाल्या होत्या. विराटची ही वन डे क्रिकेटमधली ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. आशिया चषकात भारत-पाक संघर्ष सामने - 14 भारत - 8 पाकिस्तान - 5 अनिर्णित/रद्द - 1