मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Vinod Kambli: नोकरी देता का नोकरी? टीम इंडियाच्या माजी कसोटीवीराची नोकरीसाठी साद

Vinod Kambli: नोकरी देता का नोकरी? टीम इंडियाच्या माजी कसोटीवीराची नोकरीसाठी साद

विनोद कांबळी

विनोद कांबळी

Vinod Kambli: विनोद कांबळी निवृत्तीनंतर आपल्या विधानांमुळे आणि कारनाम्यांमुळे पुन्हा चर्चेत येऊ लागला. त्याची काही विधानं वादग्रस्त ठरली. तर दारु पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी त्याला अटकही झाली. आणि आता विनोद कांबळी पुन्हा चर्चेत आलाय. कारण विनोद म्हणतोय की तो आता आर्थिक संकटात आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 17 ऑगस्ट: मुंबईनं भारतीय क्रिकेटला अनेक मोठे खेळाडू दिले आहेत. याच मुंबई क्रिकेटच्या खाणीतून निघालेला एक हिरा म्हणजे विनोद कांबळी. आपल्या छोट्याशा क्रिकेट कारकीर्दीत विनोद कांबळीनं मोठा पराक्रम गाजवलाय. 90च्या दशकात विनोद कांबळी हा कसोटी आणि वन डेत भारताचा महत्वाचा शिलेदार होता. पण त्यानंतर विनोदची कारकीर्द उताराला लागली. आणि विनोद कांबळी हे नाव भारतीय संघातून गायब झालं.

हाच विनोद कांबळी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर आपल्या विधानांमुळे आणि कारनाम्यांमुळे पुन्हा चर्चेत येऊ लागला. त्याची काही विधानं वादग्रस्त ठरली. तर दारु पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी त्याला अटकही झाली. आणि आता विनोद कांबळी पुन्हा चर्चेत आलाय कारण विनोद म्हणतोय की तो आता आर्थिक संकटात आहे. आणि त्याला नोकरीची गरज आहे.

मला काम हवंय...

विनोदनं नुकत्याच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय... “मी एक निवृत्त क्रिकेटर आहे आणि पूर्णपणे बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनवर अवलंबून आहे. ही पेन्शन हेच माझं उत्पन्न आहे. त्यासाठी मी बीसीसीआयचा आभारी आहे. मला काम हवं आहे. जेणेकरून मी युवा क्रिकेटपटूंना मदत करू शकेन. मुंबईनं अमोल मुझुमदारल मुख्य प्रशिक्षकपद दिलं. माझी गरज पडली तर मी योगदान देण्यास तयार आहे. माझं एक कुटुंब आहे आणि मला त्यांची काळजी घ्यावी लागेल. निवृत्तीनंतर तुम्हाला आयुष्यात स्थिरता हवी असते. आणि त्यासाठीच मला असाईन्मेट हवी आहे. मी एमसीए अध्यक्षांना विनंती करतो की माजी गरज भासल्यास मी तयार आहे.”

हेही वाचा - KKR: आता आयपीएलमध्येही भरणार पंडित गुरुजींची शाळा, चंद्रकांत पंडित केकेआरचे नवे प्रशिक्षक

विनोदची क्रिकेट कारकीर्द

विनोदनं आपल्या कारकीर्दीची सुरुवात शालेय वयापासून केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्यानं हॅरिस शिल्डमध्ये केलेला 664 धावांच्या भागीदारीचा विक्रम आजही अबाधित आहे. विनोदनं भारताकडून 17 कसोटी आणि 104 वन डे सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. 2000 साली विनोदनं आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

सचिनच्या अकादमीत प्रशिक्षक

युवा क्रिकेटपटूंना जागतिक स्तरावरच्या प्रशिक्षण सुविधा पुरवण्यासाठी सचिन तेंडुलकर ग्लोबल क्रिकेट अकादमीची 2019 साली स्थापना झाली होती. सचिनच्या या अकादमीत विनोद कांबळीकडे प्रशिक्षकपद सोपवण्यात आलं होतं.त्यासाठी कांबळीनं सचिनचे आभार मानले होते.

First published:

Tags: Cricket, Mumbai, Vinod kambli