विराट कोहली पहिल्या सराव सामन्यादरम्यान
ब्रिस्बेन, 17 ऑक्टोबर: टीम इंडियानं ब्रिस्बेनच्या पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला 6 धावांनी धूळ चारली. मोहम्मद शमीचं जबरदस्त कमबॅक हे या सामन्याचं वैशिष्ट्य ठरलं. शमीच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये ऑस्ट्रेलियाचे 4 बॅट्समन माघारी परतले. पण त्याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीनं बाऊंड्री लाईनवर अफलातून कॅच पकडलं. विराटचं हेच कॅच गेम चेंजर ठरलं. लाँग ऑनला विराटचं एकहाती कॅच पॅट कमिन्सच्या बॅटमधून निघालेला तो फटका बाऊंड्रीलाईनजवळ विराटनं एका हातानं टिपला. जर त्या फटक्यावर सिक्स मिळाली असती तर टीम इंडियाला हा सामना गमवावा लागला असता. पण विराटनं जबरदस्त चपळाईनं हवेत सूर मारुन एकहाती तो कॅच पकडला. त्यानंतर शमीनं ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या बॅट्समनना एकही धाव काढू दिली नाही. दरम्यान विराटच्या कॅचचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय.
कॅचआधी रन आऊट त्याआधी 19 व्या ओव्हरमध्ये विराटनं टिम डेव्हिडला माघारी धाडलं. एक रन घेण्याच्या नादात नॉन स्ट्राईक एन्डला असलेला टिम डेव्हिड विराटच्या डायरेक्ट हिटवर रन आऊट झाला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 9 बॉलमध्ये 15 धावा हव्या होत्या. टिम डेव्हिड हा कांगारुंच्या संघातील सर्वात धोकादायक बॅट्समनपैकी एक आहे. पण विराटनं त्याला रन आऊट केलं आणि टीम इंडियाच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला.
हेही वाचा - T20 World Cup: तो परत आलाय! 4 बॉल 4 विकेट, टीम इंडियाच्या ‘या’ बॉलरचं जबरदस्त कमबॅक टीम इंडियाची दमदार सुरुवात रविवारी 23 ऑक्टोबरला भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना खेळवण्यात येईल. पण त्याआधी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. त्यातला पहिला सामना आज पार पडला. हा सामना जिंकून भारतीय संघानं दमदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाचा पुढचा सराव सामना बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळवला जाणार आहे.