विराट कोहलीचं भावूक ट्विट
मुंबई, 11 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियातल्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतून भारतीय टीम बाहेर पडली. त्यामुळे टीमच्या कामगिरीवर सध्या टीका होत आहे. मात्र या स्पर्धेमध्ये भारताचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं चांगली खेळी करत चाहत्यांची मनं जिंकली. मात्र टीमला फायनलपर्यंत पोहोचवण्यात विराटला अपयश आलं. याचं विराटला दुःख आहे. ऑस्ट्रेलियातून मायदेशी निघण्यापूर्वी ट्विटरच्या माध्यमातून त्यानं त्याच्या भावना व्यक्त केल्या. ट्विटमध्ये विराट म्हणाला… ‘आम्ही आमचं स्वप्न पूर्ण न करताच निराश मनानं ऑस्ट्रेलियामधून परतत आहोत. मात्र या स्पर्धेतून काही चांगल्या आठवणीही सोबत घेऊन आम्ही जात आहोत. टीम म्हणून आम्ही भविष्यात आणखी चांगली कामगिरी करू. मॅच पाहण्यासाठी आणि आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या स्टेडियममधल्या प्रत्येक प्रेक्षकाला धन्यवाद. ही जर्सी घालून देशासाठी खेळताना मला नेहमीच अभिमान वाटतो.’ असं विराटनं या ट्विटमध्ये लिहिलं आहे.
वर्ल्ड कपमध्ये विराट कामगिरी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विराटनं 6 मॅच खेळल्या. या 6 डावांत 98.66 च्या सरासरीनं त्यानं एकूण 296 रन्स केले. सध्या या स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट पहिल्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत त्यानं 4 अर्धशतकं झळकावली. इंग्लंडच्या विरुद्धही त्यानं 40 बॉल्समध्ये 50 रन्स केले. 4 फोर आणि एक सिक्स मारत विराटनं उपांत्य फेरीत भारतीय टीमला चांगली धावसंख्या उभारायला मदत केली. मात्र तरीही इंग्लंडकडून भारताचा पराभव झाला. हेही वाचा - Team India: सेमी फायनलमध्ये हरले, तरीही झाले करोडपती; पाहा भारतीय खेळाडूंना किती मिळालं बक्षिस? विराट पुन्हा फॉर्मात विराटचा फॉर्म परत आल्यामुळे त्याचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. स्पर्धेत आत्तापर्यंतची भारताची कामगिरी पाहता फायनलपर्यंत पोहेचण्याची अपेक्षा प्रेक्षकांना होती. मात्र टी-20 मॅचेसमध्ये अनपेक्षित गोष्टी घडू शकतात त्याप्रमाणे भारताचं आव्हान सेमीफायनलमध्येच संपुष्टात आलं. हेही वाचा - Eng vs Pak: फायनलमध्ये पाकिस्तान हरणार! इंग्लंडसाठी ठरली ‘ही’ गुड न्यूज… पाहा काय आहे प्रकरण टीम इंडिया ऑस्ट्रेलियातून रवाना दरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलियातून मायदेशी रवाना झाला आहे. पण काही खेळडू मात्र न्यूझीलंडला जाणार आहेत. भारताचा आगामी न्यूझीलंड दौरा 18 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी20 आणि 3 वन डे सामने खेळणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड झालेले भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियातूनच ऑकलंडला रवाना होतील.