जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Eng vs Pak: फायनलमध्ये पाकिस्तान हरणार! इंग्लंडसाठी ठरली 'ही' गुड न्यूज... पाहा काय आहे प्रकरण

Eng vs Pak: फायनलमध्ये पाकिस्तान हरणार! इंग्लंडसाठी ठरली 'ही' गुड न्यूज... पाहा काय आहे प्रकरण

मेलबर्नमध्ये इंग्लंड जिंकणार?

मेलबर्नमध्ये इंग्लंड जिंकणार?

Eng vs Pak: एमसीजीवर होणाऱ्या फायनलसाठी श्रीलंकेचे अनुभवी अम्पायर कुमार धर्मसेना आणि दक्षिण आफ्रिकेचे मॅरिस इरॅस्मस अम्पायरिंग करणार आहेत. आयसीसीनं या महत्वाच्या सामन्यासाठी त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मेलबर्न, 11 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी अंतिम लढत होणार आहे. बाबर आझमची पाकिस्तान आणि जोस बटलरचा इंग्लंड संघ या निर्णयाक लढतीसाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोन्ही संघांनी टी20 वर्ल्ड कप जिंकून आता दशक उलटलं आहे. पाकिस्ताननं 2009 साली विजेतेपद पटकावलं होतं. तर त्याच्या पुढच्याच वर्षी इंग्लंड विश्वविजेते ठरले होते. त्यामुळे दीर्घकाळची प्रतीक्षा संपवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहील. पण याचदरम्यान इंग्लंडची विजयाची शक्यता मात्र बळावली आहे. आणि त्याचं थेट कनेक्शन आहे ते 2019 च्या वन डे वर्ल्ड कपशी. पाकिस्तान हरणार, इंग्लंड जिंकणार? पाकिस्तान आणि इंग्लंड हे दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. पाकिस्ताननं न्यूझीलंडला हरवून फायनलचं तिकीट पक्क केलं आहे. तर इंग्लंडनं टीम इंडियाचा पराभव करुन फायनल गाठली. त्यामुळे मेलबर्नमध्ये 13 नोव्हेंबरला वर्ल्ड कप पटकावण्यासाठी या दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळेल. आज आयसीसीनं याच लढतीच्या पार्श्वभूमीवर मॅच ऑफिशियल्सची नावं जाहीर केली आहेत. ही नावं पाहून इंग्लंडला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील. कारण 2019 साली वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडला नशीबानं चांगलीच साथ दिली होती. त्यावेळी मैदानात अम्पायरिंगचं काम पाहणारी जोडी पुन्हा एकदा  या वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही पाहायला मिळणार आहे.

जाहिरात

धर्मसेना, इरॅस्मस फायनलसाठी अम्पायर एमसीजीवर होणाऱ्या फायनलसाठी श्रीलंकेचे अनुभवी अम्पायर कुमार धर्मसेना आणि दक्षिण आफ्रिकेचे मॅरिस इरॅस्मस अम्पायरिंग करणार आहेत. आयसीसीनं या महत्वाच्या सामन्यासाठी त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. महत्वाची बाब म्हणजे लॉर्ड्सवर 2019 साली झालेल्या वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये याच दोघांनी ऑन फिल्ड अम्पायरची भूमिका बजावली होती. सामना आणि त्यानंतर सुपर ओव्हर टाय झालेल्या त्या मॅचमध्ये अखेर इंग्लंडनं बाजी मारली होती. त्यामुळे पुन्हा एकदा हे अम्पायर इंग्लंडसाठी लकी ठरणार का? हे पाहणं महत्वाचं ठरेल.

News18

मॅच ऑफिशियल्स पॅनेल कुमार धर्मसेना, श्रीलंका - ऑन फिल्ड अम्पायर मॅरिस इरॅस्मस, दक्षिण आफ्रिका - ऑन फिल्ड अम्पायर ख्रिस ग्रॅफनी, न्यूझीलंड - टीव्ही अंपायर पॉल रिफेल, ऑस्ट्रेलिया - फोर्थ अम्पायर रंजन मदुगले, श्रीलंका - सामनाधिकारी हेही वाचा -  Team India: लाजीरवाण्या पराभवानंतर ‘पहिली विकेट’, टीम इंडियाच्या ‘या’ सदस्याचा करार संपुष्टात दुसऱ्यांदा वर्ल्ड कप कोण जिंकणार? टी20 वर्ल्ड कपच्या आजवरच्या इतिहासात केवळ वेस्ट इंडिज हा असा संघ आहे ज्यानं दोन वेळा विजेतेपद पटकावलं आहे. 2012 आणि 2016 साली वेस्ट इंडिजनं वर्ल्ड कप जिंकला होता. पण आता पाकिस्तान आणि इंग्लंडसमोर ती संधी चालून आली आहे. या दोन्ही संघांनी याआधी वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे मेलबर्नच्या मैदानात दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप कोण जिंकणार याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात