JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO : शर्टही काढ आता, विराटला मैदानातच आला राग; फलंदाजाला सुनावले

VIDEO : शर्टही काढ आता, विराटला मैदानातच आला राग; फलंदाजाला सुनावले

विराटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो सामन्यावेळी मैदानात बांगलादेश संघाच्या फलंदाजाला सुनावताना दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ढाका, 24 डिसेंबर : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत आहे. या मालिकेतील विराटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो सामन्यावेळी मैदानात बांगलादेश संघाच्या फलंदाजाला सुनावताना दिसत आहे. विराटला यामध्ये राग आल्याचं दिसून येत आहे. शेअर ए बांगला नॅशनल स्टेडियममध्ये भारत - बांगलादेश दुसरी कसोटी सुरू आहे. यात दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला बांगलादेशचा सलामीवीर नजमुल हुसैन शांतो नॉन स्ट्रायकर एंडला आपल्या शूजच्या लेस बांधत होता. यावेळी डगऊटमधून खेळाडुसुद्धा ड्रिंक्स घेऊन मैदानावर आले. तेव्हा तिसऱ्या सत्रातील 6 षटकांचा खेळ झाला होता. मैदानावर प्रकाश कमी होत होता. हेही वाचा :  मेस्सीचं जय शहांना सरप्राइज, वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जर्सी दिली गिफ्ट

 अंधुक प्रकाशामुळे खेळ लवकर बंद होण्याच्या आधी काही षटके खेळ व्हावा असं विराटला वाटत होतं. यातच फलंदाज वेळ वाया घालवत असल्याचं विराटलं वाटलं. तेव्हा विराटने शांतोला डिवचलं. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ पाहिल्यास असं वाटतं की, तो शांतोला शर्टही काढण्याचा इशारा करत आहे.

संबंधित बातम्या

काही वेळाने पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. बांगलादेशने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात बिनबाद ७ धावा केल्या होत्या. तर शांतो 5 धावा करून नाबाद राहिला आणि जाकिर हसन 2 धावांवर नाबाद होता. हेही वाचा :  धोनीनंतर बेन स्टोक्स बनणार कर्णधार? चेन्नई सुपर किंग्जच्या सीईओंनी केला खुलासा भारताचा पहिला डाव 314 धावांत संपुष्टात आला. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सर्वाधिक 93 धावांची खेळी केली तर श्रेयस अय्यर 105 चेंडूत 87 धावा काढून बाद झाला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी 159 धावांची भागिदारी केली. तर विराट कोहलीने 24 धावा केल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि ताइजुल इस्लाम दोघांनीही प्रत्येकी 4 गडी बाद केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या