जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / धोनीनंतर बेन स्टोक्स बनणार कर्णधार? चेन्नई सुपर किंग्जच्या सीईओंनी केला खुलासा

धोनीनंतर बेन स्टोक्स बनणार कर्णधार? चेन्नई सुपर किंग्जच्या सीईओंनी केला खुलासा

बेन स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्जने मोठी बोली लावत संघात घेतलं. बेन स्टोक्ससाठी चेन्नईने १६.५ कोटी रुपये मोजले. बेन स्टोक्सला आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत तिसऱ्यांदा १० कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली लागली आहे.

बेन स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्जने मोठी बोली लावत संघात घेतलं. बेन स्टोक्ससाठी चेन्नईने १६.५ कोटी रुपये मोजले. बेन स्टोक्सला आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत तिसऱ्यांदा १० कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली लागली आहे.

अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावण्यासह स्टोक्स संघाचे नेतृत्वही करू शकतो. त्यामुळे चेन्नईच्या ताफ्यात स्टोक्स येताच धोनीनंतर त्याच्याकडेच संघाचे नेतृत्व दिले जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 डिसेंबर : महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आय़पीएल 2023 च्या लिलावात बेन स्टोक्सला मोठी रक्कम मोजून संघात घेतलं. चेन्नईने स्टोक्ससाठी 16.25 कोटी रुपयांची बोली लावली. अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावण्यासह स्टोक्स संघाचे नेतृत्वही करू शकतो. त्यामुळे चेन्नईच्या ताफ्यात स्टोक्स येताच धोनीनंतर त्याच्याकडेच संघाचे नेतृत्व दिले जाईल अशी चर्चा सुरू झाली. आता या सगळ्या चर्चा सुरू असताना चेन्नई सुपर किंग्जच्या सीईओंनी प्रतिक्रिया दिली आहे. सीएसकेडे सीईओ काशी विश्वनाथ यांनी म्हटलं की, स्टोक्सला संघात घेतल्यानंतर आम्ही खूप आनंदी होतो आणि नशीबवानसुद्धा कारण शेवटी तो आमच्या संघाला मिळाला. आम्हाला एक अष्टपैलू क्रिकेटर हवा होता आणि स्टोक्सला घेतल्यानं एम एस धोनीही आनंदी होता. कर्णधारपदाचा पर्याया आहे पण धोनी वेळेनुसार याबाबत निर्णय घेईल. हेही वाचा : IPL Auction : क्रिकेटसाठी सोडलं गाव, लिलावात पडला पैशांचा पाऊस, वडील चालवायचे रिक्षा बेन स्टोक्सशिवाय चेन्नई सुपर किंग्जने न्यूझीलंडच्या काइल जेमीसनलासुद्धा संघात घेतलं आहे. गेल्या वर्षी आरसीबीने त्याला 15 कोटी रुपयात खरेदी केलं होतं. त्याला यावेळी चेन्नईने बेस प्राइजवरच संघात घेतलं. सीएसकेचे सीईओ म्हणाले की, जेमीसन जखमी झाला होता त्यामुळे इतर संघांनी त्याच्यावर बोली लावली नाही. हेही वाचा :  मिनी लिलावात मेगा खरेदी! फ्रँचाइजींनी 5 खेळाडुंवर खर्च केले 82 कोटी काइल जेमीसनला दुखापत झाली होती म्हणून बहुतेक इतरांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आम्हाला फ्लेमिंगकडून माहिती मिळाली होती की तो बरा झाला आहे आणि खेळण्यासाठी उत्सुक आहे. आम्हाला आशा आहे की आम्ही या हंगामात चांगली कामगिरी करेन. आम्ही नेहमीच प्रक्रियेचं पालन केलं आहे आणि आम्हाला यातून चांगलं करण्यास मदत होईल अशी आशाही चेन्नईच्या सीईओंनी म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात