भारताची खेळाडू अर्चना देवी हिची आई सावित्री देवी यांनी मुलीची फायनल मॅच पाहण्यासाठी एक एक पैसा जोडून इन्व्हर्टर खरेदी केला आहे.
मुंबई, 29 जानेवारी : आज आयसीसीच्या अंडर 19 महिला वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पार पडणार आहे. पहिल्यांदाच आयसीसीतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, भारताच्या महिला क्रिकेट संघाने सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडवत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज कर्णधार शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकून भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे. या सामन्याकडे सर्वच भारतीय क्रीडा रसिकांचे डोळे लागले आहेत. अशातच भारताची खेळाडू अर्चना देवी हिच्या आईने मुलीची फायनल मॅच पाहण्यासाठी एक एक पैसा जोडून इन्व्हर्टर खरेदी केला आहे. हे ही वाचा : IND VS NZ : टीम इंडिया करू शकेल का न्यूझीलंडशी बरोबरी? आज न्यूझीलंड विरुद्ध दुसरा टी 20 सामना दक्षिण आफ्रिका येथे सुरु असलेल्या अंडर 19 महिला वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघातून खेळणारी १८ वर्षीय अर्चना देवी ही उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील रहिवासी आहे. अर्चना अतिशय गरीब कुटुंबातील असून तिने तिच्या गावात विजेची तीव्र समस्या आहे. तिच्या गावात वीज येते त्यापेक्षा जास्त अधिक वेळा ती जाते.
अतिशय कष्ट करून अर्चनाला वाढवणाऱ्या तिच्या आईला मुलीला भारतीय संघातून फायनलमध्ये खेळताना पहायचे आहे. तेव्हा हा सामना पाहत असताना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून तिची आई सावित्री हिने पायीपायी जोडून इंव्हेटर खरेदी केला आहे. हे ही वाचा : Under 19 WC : वर्ल्ड कप जिंकून भारतीय महिला संघ रचणार इतिहास? कुठे, कधी पहाल अंतिम सामना अर्चनाची आई सावित्री देवी ही तिच्या स्मार्टफोनवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार अंतिम सामना पाहणार आहे. दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी अर्चनाने आईला स्मार्ट फोन घेऊन दिला होता. परंतु संपूर्ण सामना पाहण्यासाठी मोबाईल चार्ज करणे आवश्यक आहे. तेव्हा आई सावित्री यांनी ही समस्या लक्षात घेऊन त्याच्यावर उपाय शोधला. अंडर १९ महिला वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात मुलीला पाहण्यासाठी त्यांनी ५० रुपये जोडून एक इन्व्हर्टर विकत घेतला आहे.
एका वृत्तपत्राशी बोलताना अर्चनाची आई सावित्री देवी म्हणाल्या, “आमच्या गावात विजेची शाश्वती नाही. त्यामुळे मी इन्व्हर्टर घेण्यासाठी पैसे वाचवले. माझी मुलगी विश्वचषक फायनल खेळणाऱ्या संघात आहे आणि आम्हाला कोणत्याही व्यत्ययाशिवाय आमच्या मोबाईल फोनवर सामना बघायचा आहे.”