मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND VS NZ : टीम इंडिया करू शकेल का न्यूझीलंडशी बरोबरी? आज न्यूझीलंड विरुद्ध दुसरा टी 20 सामना

IND VS NZ : टीम इंडिया करू शकेल का न्यूझीलंडशी बरोबरी? आज न्यूझीलंड विरुद्ध दुसरा टी 20 सामना

न्यूझीलंड विरुद्ध मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी आज भारतीय संघाला आपले सर्वस्वपणाला लावावे लागणार आहे.  हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल, पृथ्वी शॉ या फॉर्मात असलेल्या खेळाडूंवर भारतीय संघाची मदार असणार आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 जानेवारी : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दुसरा सामना आज पार पडणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून 21 धावांनी पराभूत झालेल्या भारतीय संघासाठी दुसरा सामना करो या मरो सारखा असेल. मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी आज भारतीय संघाला आपले सर्वस्वपणाला लावावे लागणार असून न्यूझीलंड संघाकडे देखील हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याची संधी असणार आहे.

रांची येथील स्टेडियमवर 27 जानेवारी रोजी न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना पारपडला होता. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला न्यूझीलंडने दिलेले 177 धावांचे आव्हान पूर्ण करता आले नाही. 9 बाद 155 धावांपर्यंतच मजल मारून भारताचा 21 धावांनी पराभव झाला. तेव्हा वनडे मालिकेत भारताकडून व्हाईट वॉश सहन केलेल्या न्यूझीलंड संघाने भारत विरुद्ध टी 20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

हे ही वाचा  : Under 19 WC : वर्ल्ड कप जिंकून भारतीय महिला संघ रचणार इतिहास? कुठे, कधी पहाल अंतिम सामना

आजचा सामना जिंकून मालिकेत न्यूझीलंडशी बरोबरी करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल, पृथ्वी शॉ या  फॉर्मात असलेल्या खेळाडूंवर आज भारतीय संघाची मदार असणार आहे.

कधी होणार सामना :

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात २९ जानेवारी रोजी लखनौच्या अटल बिहारी बाजपेयी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. सायंकाळी ७ वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल.

कुठे पहाल सामना :

न्यूझीलंड विरुद्धचा दुसरा सामना क्रिकेट प्रेमींना स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल. तसेच डिझनी +हॉट्सस्टारवर अँपवर देखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

भारताचा टी २० संघ :

हार्दिक पांड्या, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, पृथ्वी शॉ, युझवेंद्र चहल, जितेश शर्मा, मुकेश कुमार

First published:

Tags: Cricket, Cricket news, New zealand, T20 cricket, Team india