मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Under 19 WC : वर्ल्ड कप जिंकून भारतीय महिला संघ रचणार इतिहास? कुठे, कधी पहाल अंतिम सामना

Under 19 WC : वर्ल्ड कप जिंकून भारतीय महिला संघ रचणार इतिहास? कुठे, कधी पहाल अंतिम सामना

भारताच्या महिला क्रिकेट संघाने सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडवत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज कर्णधार शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकून भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे.

भारताच्या महिला क्रिकेट संघाने सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडवत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज कर्णधार शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकून भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे.

भारताच्या महिला क्रिकेट संघाने सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडवत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज कर्णधार शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकून भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 जानेवारी : आज आयसीसीच्या अंडर 19 महिला वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पार पडणार आहे. पहिल्यांदाच आयसीसीतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, भारताच्या महिला क्रिकेट संघाने सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडवत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज कर्णधार शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकून भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे. तेव्हा भारतीय संघ अंतिम सामन्यात इंग्लंडला नमवून पहिल्या वहिल्या अंडर 19 महिला वर्ल्ड कपवर आपले नाव कोरण्यात यशस्वी ठरतो का? हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या आयसीसी महिला अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची कामगिरी ही सुरुवातीपासूनच उत्तम राहिली आहे. ग्रुप सामने आणि सुपर सिक्समध्ये केलेल्या अव्वल दर्जाच्या कामगिरी नंतर भारताने सेमी फायनल सामन्यातही न्यूझीलंडचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला. तर अंतिम फेरी गाठलेल्या इंग्लंड संघाने देखील सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 3 धावांनी पराभव केला.

आता अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंडचा महिला संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यात भारतीय संघाची कमान ही कर्णधार शेफाली वर्मा, श्वेता सेहरावत, सौम्या तिवारी, ऋषिता बासू  इत्यादी क्रिकेटपटूंच्या खेळीवर अधिक निर्भर असेल.

  हे ही वाचा  : क्रीडा प्रेमींसाठी सुपर संडे, दोन वर्ल्ड कप फायनल अन् बरंच काही; पाहा शेड्युल

कधी होणार सामना :

आयसीसी अंडर 19 महिला वर्ल्ड कपचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेच्या Senwes park , Potchefstroom येथे रंगणार आहे. आज रविवार २९ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून यापूर्वी अर्धातास दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केली जाईल.

कुठे होणार सामना :

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अंतिम सामना हा स्टार स्पोर्ट्सच्या स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ वर दाखवला जाईल.

भारतीय संघ :

शफाली वर्मा, श्वेता सेहरावत, सौम्या तिवारी, गोंगडी त्रिशा, ऋचा घोष, हृषिता बसू, तीतस साधू, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्श्वी चोप्रा, सोनम यादव, सोप्पधंडी यशश्री, फलक नाझ, शबनम मेनिया एमडी, हर्ले गाला

न्यूझीलंड संघ :

ग्रेस स्क्रिव्हन्स, लिबर्टी हीप, नियाम फिओना हॉलंड, सेरेन स्माले, रायना मॅकडोनाल्ड गे, चॅरिस पावली, अलेक्सा स्टोनहाउस, सोफिया स्मेल, जोसी ग्रोव्हस, एली अँडरसन, हन्ना बेकर, एम्मा मार्लो, डेविना सारा टी पेरिन, मॅडी ग्रेस वॉर्ड, लिझी स्कॉट

First published:

Tags: Cricket, Cricket news, India vs england, Indian women's team