JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ind vs NZ: टी20 नाही पण वन डेत तरी 'या' खेळाडूला संधी? धवनच्या भारतीय संघात हे 6 बदल निश्चित

Ind vs NZ: टी20 नाही पण वन डेत तरी 'या' खेळाडूला संधी? धवनच्या भारतीय संघात हे 6 बदल निश्चित

Ind vs NZ: नुकत्याच झालेल्या टी20 मालिकेत काही खेळाडूंना संधी मिळाली नाही. या खेळाडूंना शिखर धवन आपल्या संघात स्थान देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

जाहिरात

कशी असेल शिखर धवनची प्लेईंग इलेव्हन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ऑकलंड, 23 नोव्हेंबर: शिखर धवनच्या नेतृत्वात न्यूझीलंड दौऱ्यावर असलेली टीम इंडिया सज्ज झाली आहे ती आगामी वन डे मालिकेसाठी. येत्या शुक्रवारपासून भारत आणि यजमान न्यूझीलंड संघात तीन सामन्यांची वन डे मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमध्ये खेळवला जाणार आहे. याच मालिकेआधी भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनवरुन अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. कारण टी20 मालिकेत काही खेळाडूंना संधी मिळाली नाही. या खेळाडूंना शिखर धवन आपल्या संघात स्थान देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हार्दिक पंड्याच्या टीमशी तुलना करता धवनच्या संघात हे सहा बदल निश्चित मानले जात आहेत. धवन-गिल करणार ओपनिंग टी20 मालिकेत ईशान किशन आणि रिषभ पंत ही जोडी सलामीला उतरली होती. पण वन डेत कॅप्टन शिखर धवनसह शुभमन गिल सलामीला उतरणार आहे. ईशान किशनचा वन डे मालिकेसाठीच्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या गेल्या वन डे मालिकेत धवन आणि गिल ही जोडी सलामीला मैदानात उतरली होती.

संजू सॅमसनला मिळणार संधी वन डे मालिकेसाठी रिषभ पंत टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. त्यामुळे टीममध्ये त्याची जागा पक्की मानली जात आहे. पण तरीही संजू सॅमसनला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. टी20 मालिकेत संजूला एकाही सामन्यात खेळवण्यात आलं नाही. त्यामुळे वन डेत त्याला संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.

शार्दूल-शाहबाजचा समावेश  भारतीय संघात वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाझ अहमदचा समावेश केला जाऊ शकतो. शार्दूलनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन मॅचमध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या. तर एका मॅचमध्ये 33 धावांची खेळीही केली होती. दुसरीकडे रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेलच्या अनुपस्थितीत शाहबाझ अहमदवर विश्वास टाकला जाण्याचा अंदाज आहे. हेही वाचा -  FIFA WC 2022: जोश आणि जल्लोष… सौदीत साजरी झाली दिवाळी, किंग सलमाननं केली ‘ही’ मोठी घोषणा दीपक चहरचं कमबॅक टी20 वर्ल्ड कपसाठी दीपच चहर स्टँड बाय खेळाडूंच्या यादीत होता. पण त्याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत चहरला दुखापत झाली आणि त्याचं ऑस्ट्रेलियाचं तिकीट कॅन्सल झालं. पण आता तो फिट झाला असून कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे.

भारत-न्यूझीलंड वन डे मालिका 25 नोव्हेंबर, पहिली वन डे - ऑकलंड 27 नोव्हेंबर, दुसरी वन डे - हॅमिल्टन 30 नोव्हेंबर, तिसरी वन डे - ख्राईस्टचर्च वन डे मालिकेतले तिन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी सात वाजता सुरु होणार आहेत. भारताचा वन डे संघ -  शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, कुलदीप सेन, अर्शदीप,  शार्दूल ठाकूर, दीपक चहर.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या