मुंबई, 23 नोव्हेंबर: फिफा वर्ल्ड कपमध्ये मंगळवारी एक मोठा उलटफेर घडला. यंदाच्या फिफा वर्ल्ड कपचे प्रबळ दावेदार म्हणून अर्जेन्टिना कतारमध्ये दाखल झाली खरी. पण याच अर्जेन्टिनाला सौदी अरेबियासारख्या संघानं पराभवाचं पाणी पाजलं. वर्ल्ड कपच्या सलामीच्या सामन्यात अर्जेन्टिनाचा सौदी अरेबियानं 2-1 असा पराभव करत इतिहास घडवला. आणि याच कारणामुळे सौदीत अक्षरश: दिवाळी साजरी झाली. याच विजयाच्या उत्साहात सौदीचे किंग सलमान यांनी एक मोठी घोषणा केली.
#Saudis make history… #SaudiArabia start #WorldCup2022 with unforgettable win over #Argentina https://t.co/yB5re1Lpzz pic.twitter.com/nKDGOHBtBS
— Saudi Gazette (@Saudi_Gazette) November 22, 2022
किंग सलमान यांची घोषणा सौदी अरेबियाचे किंग सलमान यांनी देशात बुधवारी सुट्टी जाहीर केली. त्यामुळे देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. अर्जेन्टिनासारख्या बलाढ्य संघाला हरवून सौदीच्या खेळाडूंनी देशवासियांना आश्चर्याचा खरं तर धक्का दिला होता. पण सध्या याचच देशभरात सेलिब्रेशन सुरु आहे. देशातली सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावरही आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
#VIDEO: #SaudiArabia's national anthem fills the area around the world’s tallest building, @BurjKhalifa, as the skyscraper has also covered in green, celebrating the Green Falcons' historical winning in today’s match against #Argentina @SaudiNT_EN #WorldcupQatar2022 pic.twitter.com/I8xXdoTGWe
— Saudi Gazette (@Saudi_Gazette) November 22, 2022
सौदीचा ऐतिहासिक विजय सौदी अरेबियानं आजवर फिफा वर्ल्ड कपमध्ये दोनच विजय मिळवले होते. पण अर्जेन्टिनासारख्या अव्वल संघाला नमवण्याची ही त्यांची पहिलीच वेळ ठरली. इतकच नव्हे तर अर्जेन्टिनाला हरवणारा सौदी अरेबिया हा आशियातला पहिलाच देश ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर सगळीकडे सौदीच्या टीमचं कौतुक झालं. सौदीवासियांनी तर दिवाळी साजरी केली.
#BREAKING: King Salman orders that tomorrow, Wednesday, will be a holiday for all employees in public and private sectors as well as for students in all phases of education, in celebration of #SaudiArabia's stunning victory against Argentina in #WorldCup2022 pic.twitter.com/LaLtW5cycd
— Saudi Gazette (@Saudi_Gazette) November 22, 2022
हेही वाचा - Team India: भर मैदानात टीम इंडियाच्या खेळाडूंनी उमरान मलिकला का मारलं? Video Viral मेसीच्या अर्जेन्टिनाची वाट बिकट या स्पर्धेत सौदी अरेबिया आणि अर्जेन्टिना ग्रुप सी मध्ये आहेत. दरम्यान याच गटात आता अर्जेन्टिनाला मेक्सिको आणि पोलंडसारख्या तगड्या संघांचं आव्हान आहे. त्यामुळे बाद फेरीत प्रवेश करायचा असेल तर अर्जेन्टिनाला हे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. तर दुसरीकडे सौदीला बाद फेरीत धडक मारण्याची मोठी संधी आहे.