टीम इंडिया
हरारे, 15 ऑगस्ट**:** लोकेश राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या झिम्बाव्वे दौऱ्यावर आहे. 18 ऑगस्टपासून भारताच्या या झिम्बाब्वे दौऱ्यातील तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी काल टीम इंडियाचे शिलेदार झिम्बाब्वेत दाखल झाले. दरम्यान आज एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना टीम इंडियाचे शिलेदारही मागे नव्हते. भारतीय संघ हरारेत ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे त्याच ठिकाणी आज भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफनं देशाचा 76वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा केला. बीसीसीआयकडून फोटो शेअर भारतीय संघानं हरारेत ध्वजारोहणही केलं. बीसीसीआयनं एक फोटो शेअर करत याची माहिती दिली. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार लोकेश राहुलसह संघातील सदस्य आणि सपोर्ट स्टाफ सदस्यही उपस्थित होते.
धवनकडून देशवासियांना शुभेच्छा दरम्यान टीम इंडियाचा वन डे उपकर्णधार शिखर धवननं एक व्हिडीओ शेअर करत देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
टीम इंडियाचा कसून सराव दरम्यान भारतीय संघ गुरुवारी होणाऱ्या पहिल्या वन डे सामन्याच्या तयारीला लागला आहे. भारतीय खेळाडूंनी दोन दिवस कसून सराव केला.
हेही वाचा - Ian Chappell: तब्बल 45 वर्षानंतर इयान चॅपेल यांनी सोडलं समालोचन, पाहा काय आहे कारण? असा असेल भारताचा झिम्बाब्वे दौरा 18 ऑगस्ट – पहिली वन डे, हरारे स्पोर्टस क्लब 20 ऑगस्ट – दुसरी वन डे, हरारे स्पोर्टस क्लब 22 ऑगस्ट – तिसरी वन डे, हरारे स्पोर्टस क्लब मालिकेतले तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वा. सुरु होतील भारतीय संघ – लोकेश राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर