मेलबर्न, 15 ऑगस्ट**:** ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधर इयान चॅपेल यांनी जवळपास सहा दशकानंतर क्रिकेटपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात चॅपेल यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन 42 वर्ष लोटली आहेत. पण निवृत्तीनंतर त्यांनी समालोचकाची भूमिका स्वीकारली आणि गेली 4 दशकं ते अविरतपणे क्रिकेट कॉमेंट्री करत आले आहेत. पण 78 वर्षांच्या चॅपेल यांनी आता माईकशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. 1976 साली चॅपेल यांनी पहिल्यांदा क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि ते समालोचनाकडे वळले. पण नंतर ते पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. 1980 साली इयान चॅपेल आपला शेवटचा आंतराष्ट्रीय सामना खेळले होते. पण त्यानंतर ते एक उत्कृष्ट समालोचक बनले. चॅपेल यांचे आजोबा विक रिचर्डसन हेही एक चांगले समालोचक होते. त्यामुळे आजोबांप्रमाणेच निवृत्तीनंतर चॅपेल यांनी आपला मोर्चा कॉमेंट्री बॉक्सकडे वळवला. चॅनेल नाईनसोबत त्यांनी समालोचनाला सुरुवात केली. चॅपेल यांनी समालोचकांची एक टीमही बनवली होती. या टीममध्ये रिची बेनो, बिल लॉरी आणि टोनी ग्रेग या दिग्गज समालोचकांचा समावेश होता.
Ian Chappell has called it time with the microphone after 45 years in the commentary game.
— Cricketopia (@CricketopiaCom) August 15, 2022
Video - India v Australia, Mumbai 2001
Slater claimed a catch, but Dravid got benefit of doubt, Slater lost his cool.
Chappell lambasted Stater for his behaviour.pic.twitter.com/txl5FC1wox
आजारपणामुळे कॉमेंट्री बंद तब्बल 45 वर्ष चॅपेल क्रिकेट सामन्यांचं समालोचन करत राहिले. आताही ते एका रेडिओ चॅनेलसाठी समालोचन करत होते. पण 2019 साली त्यांना त्वचेचा कॅन्सर असल्याचं निदान झालं. त्यातून बरे होण्यासाठी त्यांना पाच महिने लागले. या आजारावर त्यांनी यशस्वीपणे मात केली पण आता वयानुसार अनेक मर्यादा आल्यानं त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. समालोचनाच्या बाबतीत चॅपेल रग्बी कॉमेंटेटर रे वॉरेन यांचं एक वाक्य नेहमी सांगतात की, “समालोचन करताना तुम्ही चूक करण्यापासून केवळ एक वाक्य दूर असता” हेही वाचा - MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीनं 7 वा. 29 मिनिटांनी निवृत्तीचा निर्णय घेतला आणि… चॅपेल यांची क्रिकेट कारकीर्द इयान चॅपेल यांनी 1964 ते 1980 या 16 वर्षात ऑस्ट्रेलियाकडून 75 कसोटी आणि 30 वन डे सामन्यात प्रतिनिधित्व केलं होतं. 75 पैकी 30 कसोटीत ते कर्णधारही होते. कसोटीत त्यांनी 14 शतकांसह 5345 धावा केल्या आहेत. 1972 सालच्या अॅडलेड कसोटीत पाकिस्तानविरुद्धची 196 धावांची खेळी त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक. दरम्यान इयान चॅपेल यांचे भाऊ ग्रेग चॅपेल आणि ट्रेवर चॅपेल यांनीही ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे.